शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीर जगातील सर्वांत मोठे पर्यावरणवादी

By admin | Updated: April 20, 2016 05:53 IST

भगवान महावीर जगातील मोठे पर्यावरणवादी होते. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी ४२ वर्षे त्यांनी भारतभ्रमण केले. त्यांनी समाजाला दिलेली शिकवण प्रत्येकाने

नागपूर : भगवान महावीर जगातील मोठे पर्यावरणवादी होते. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी ४२ वर्षे त्यांनी भारतभ्रमण केले. त्यांनी समाजाला दिलेली शिकवण प्रत्येकाने आचरणात आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले. चिटणवीस पार्क येथे श्री जैन सेवा मंडळातर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक ‘महोत्सव-२०१६’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री नजमा हेपतुल्ला, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार विजय दर्डा, खासदार अजय संचेती, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, गिरीश व्यास, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर प्रामुख्याने उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या वाणी बुद्धीवर विजय मिळविण्याची शिकवण भगवान महावीर यांनी दिली. दुसऱ्याशी संघर्ष करण्यापेक्षा स्वत:तील वाईट प्रवृत्तीवर विजय प्राप्त करण्याचा संदेश दिला. हा संदेश प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे. राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू करून भूतदयेचा विचार समाजात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. नाशिक जिल्ह्यात मांगीतुंगी महोत्सव सरकारने पुढाकार घेऊन साजरा केला. या परिसराचा तीर्थस्थळ म्हणून विकास करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारे हा महोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रारंभी श्री जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष मनीष मेहता यांनी प्रास्ताविकात गोवंश हत्याबंदी केल्याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन केले. ही संस्था समस्त जैन समाजाची एकमात्र प्रतिनिधी संस्था आहे. यात ८५ संस्थांचा समावेश असून ६५ हजार सदस्य असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेतर्फे अहिंसा अवॉर्ड देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी मुनिराज प्रशमरति विजय म.सा., सुपार्श्वसागर, म.स.गुणनंदीजी यांनी उपस्थितांना शुभआशीर्वाद दिले. कार्यक्रमाचे संचालन मंत्री सतीश पेंढारी (जैन) यांनी केले. समारंभास नगरसेविका आभा पांडे, दिलीप गांधी, विजय उदापूरकर, शरद मचाले, दीपक शेंडेकर, संजय टक्कामोरे, पंकज बोहरा, डॉ. कमल पुगलिया, रवींद्र आग्रेकर, अतुल कोटेचा, रिंकू जैन, योगेन्द्र शहा, जितेंद्र तोरावत, देवेंद्र आग्रेकर, संजय नेताजी, जयप्रकाश गुप्ता आदी उपस्थित होते.