शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात दोन बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज उद्ध्वस्त

By admin | Updated: June 18, 2017 00:42 IST

एटीएस, स्थानिक गुन्हे शाखा आणि दूरसंचार विभागाच्या पथकाने शुक्रवारी रात्री केलेल्या संयुक्त कारवाईत शहरातील प्रकाश नगर, राजीव गांधी चौक परिसरातील बेकायदेशीर

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : एटीएस, स्थानिक गुन्हे शाखा आणि दूरसंचार विभागाच्या पथकाने शुक्रवारी रात्री केलेल्या संयुक्त कारवाईत शहरातील प्रकाश नगर, राजीव गांधी चौक परिसरातील बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज उद्ध्वस्त केले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. यात हैदराबाद येथील एकाचा सहभाग असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.प्रकाश नगर येथील मातृछाया अपार्टमेंटमध्ये बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज चालविण्यात येत असल्याची माहिती, एटीएसला मिळाली होती. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखाआणि भारतीय दूरसंचार निगमच्या पथकांसह एटीएसने तेथे छापा टाकला. या वेळी या अपार्टमेंटमधील शंकर रामदास बिरादार यांच्या प्लॅटमधून बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज चालविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.या वेळी बिरादार याच्याकडे चौकशी केली असता, नंदी स्टॉप औसा रोड येथील राजवीर एंटरप्रायजेसचा मालक रवी राजकुमार साबदे हा राजीव गांधी चौक परिसरातील शिवगुरू कुंज या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज चालवित असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या तिन्ही पथकांनी तिथेही छापा टाकला असता, इलेक्ट्रॉनिक सिस्टिमद्वारे अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज चालविण्यात येत असल्याचे उघड झाले.डिस्२२ोंबर २०१६पासून हे दोघे हा बेकायदेशीर व्यवसाय करीत होते. यात हैदराबाद येथील फैज मोहम्मद हाही सहभागी असल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी रवी राजकुमार साबदे (२७), शंकर रामदास बिरादार (३३) आणि फैज मोहम्मद यांच्याविरुद्घ कलम ४२०, ३४ भादंविसह भारतीय टेलिग्राफ कायदा १९८५चे कलम ४, २०, २५सह इंडियन वायरलेस टेलिग्राफ अ‍ॅक्ट १९३३चे कलम ३, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शासनाला १५ कोटींचा फटकाबेकायदा टेलिफोन एक्स्चेंजमध्ये गेट-वे मशीनच्या साहाय्याने कॉल डायव्हर्ट करून साबदे, बिरादार आणि फैज मोहम्मद या तिघांनी शासनाला तब्बल १५ कोटी २० लाख ६४ हजारांना चुना लावला. दोन्ही ठिकाणांवरून ३ लाख ६५ हजार ५०० रुपयांच्या विविध साहित्यासह १८१ सीमकार्ड जप्त केले आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही अपार्टमेंटमधील रहिवाशांना अशा प्रकारे इथे बेकायदेशीर कारभार सुरू असल्याची कुणकुणही तब्बल सहा महिने लागली नाही.फैज मोहम्मदचा संबंध?हा फैज मोहम्मद कोण? त्याचा लातुरातील दोघांशी संबंध कसा आला? यांचा विदेशात कुठे संपर्क झाला? याची अधिक चौकशी सुरू आहे. फैज मोहम्मदची पोलीस आणि एटीएस पथकाकडून चौकशी झाल्यानंतरच या प्रकरणाची पूर्ण माहिती पुढे येणार आहे. या प्रकरणाचा पोलीस वेगवेगळ्या अंगाने तपास करीत आहेत.रवी साबदे, शंकर बिरादार यांनी केवळ पैसे मिळविण्यासाठी हे अवैध टेलिफोन एक्स्चेंज उभारल्याचे पुढे आले आहे. त्याच्या माध्यमातून देश-विदेशात कॉलिंग झाले असले तरी, दहशतवादी संघटनांशी कुठलाही संपर्क झाला नसल्याचे प्राथमिक चौकशीतून पुढे आले आहे.- डॉ. शिवाजीराव राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक