शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा नवा चॅम्पियन! MI 'आउट'; PBKS ला फायनलमध्ये नेत श्रेयस अय्यरनं रचला इतिहास
2
बीड: पालखी महामार्गावर टेम्पो व रिक्षाचा भीषण अपघात, पती-पत्नीसह एकूण चार जण ठार
3
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण
4
रायगड किल्ल्यावर उत्खननात आढळले 'यंत्रराज' सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण
5
IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास
6
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
7
IPL 2025 Qualifier 2 : हार्दिक पांड्यानं Josh Inglis ची विकेट घेतली अन् अंपायर आला चर्चेत, कारण...
8
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
9
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
10
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
11
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
12
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
13
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
14
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
15
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
16
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
17
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
18
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
19
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
20
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  

घराचे आमिष दाखवून लुबाडले

By admin | Updated: May 8, 2016 03:46 IST

म्हाडामध्ये आमदार कोट्यातून घर मिळवून देण्याच्या नावाखाली कोटींचा गंडा घालणाऱ्या ठगाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. राजेश शिंदे असे आरोपीचे नाव

मुंबई : म्हाडामध्ये आमदार कोट्यातून घर मिळवून देण्याच्या नावाखाली कोटींचा गंडा घालणाऱ्या ठगाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. राजेश शिंदे असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून बनावट कागदपत्रांसह दोन वाहने जप्त करण्यात आली आहे. म्हाडा वसाहतींमध्ये आमदारांसाठी राखीव असलेली घरे आमदार कोट्यातून मिळवून देण्याचे आमिष शिंदे दाखवत होता. बाजारभावापेक्षा कमी किमतीत घर मिळत असल्याने अनेक जण त्याच्या जाळ्यात ओढले गेले. बनावट अधिसूचनेद्वारे तो नागरिकांचा विश्वास संपादन करत होता. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल होताच तपास पथकाने शोध सुरू केला. शिंदे रायगड येथील मुरूडमध्ये राहत असलेल्या आजीच्या घरी असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार या ठिकाणी सापळा रचून शिंदेच्या मुसक्या आवळण्यात आल्या. शिंदे याच्या माहीम आणि प्रभादेवी येथील राहत्या घरातून एक दुचाकी आणि कार जप्त केली आहे. तसेच अनेक बनावट कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. (प्रतिनिधी)- म्हाडा वसाहतींमध्ये आमदारांसाठी राखीव असलेली घरे आमदार कोट्यातून मिळवून देण्याचे आमिष शिंदे दाखवत होता. - त्याने अशा प्रकारे ११३ जणांना फसवून त्यांच्याकडून तब्बल ७ कोटी ७५ लाख रुपये उकळले.