शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांकडे सहानुभूतीने बघा

By admin | Updated: April 3, 2015 02:42 IST

वित्तीय चक्राच्या निर्मितीने कशी किमया साधता येते, याचे उदाहरण आपण पंतप्रधान जन-धन योजनेच्या माध्यमातून पाहिले.

मुंबई : वित्तीय चक्राच्या निर्मितीने कशी किमया साधता येते, याचे उदाहरण आपण पंतप्रधान जन-धन योजनेच्या माध्यमातून पाहिले. १४ कोटी खात्यांद्वारे १४ हजार कोटी रुपये वित्तीय व्यवस्थेत आले. पण, ही केवळ सरकारनेच चालविण्याची योजना नसून या योजनेत भारतीय रिझर्व्ह बँकेने सक्रिय सहभागी होतानाच, आर्थिक योजनेचा मध्यबिंदू देशातील गरिब असावा, असे मत पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी व्यक्त केले. भारतीय रिझर्व्ह बँकेला ८० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वित्तीय समायोजन, वित्तीय व्यवस्थेची गरिबांबद्दल असलेली अनास्था, कालमर्यादा निश्चित करून आखल्या जातील अशा लोकाभिमुख योजना आणि मेक इन इंडिया या मुद्यांभोवती पंतप्रधानांनी भाष्य केले. देशातील गरिब लोकांना बँकिंग व्यवस्थेचा अधिकाधिक फायदा होणे गरजेचे असल्याची भूमिका मांडतानाच, बँकांनी गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय द्यायला हवा, असे आवाहन मोदी यांनी केले. विशेषत: शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत चिंता व्यक्त करतानाच बँकिंग व्यवस्थेचा प्रसार योग्य पद्धतीने होणे गरजेचे असून, त्यांना वित्तपुरवठा करताना त्यात निधीचा अभाव येऊ नये. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा केवळ वर्तमानपत्र आणि टीव्ही मीडियापुरता मर्यादित विषय नसून शेतकऱ्यांना मदत केल्याने बँका दिवाळखोरीत निघणार नाहीत हे बँकांनीदेखील समजून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. गरीब आणि शेतकरी या दोन्ही घटकांना कर्ज देताना आणि त्याची वसुली करताना बँकांनी संवेदनशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.वित्तीय व्यवस्थेत सहभागी होण्यासाठी आणि त्याचे फायदे सर्व स्तरातील लोकांना मिळण्यासाठी धोरण राबविले जात आहे. आगामी २० वर्षांत याची व्याप्ती तळागाळापर्यंत नेण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची सूचना त्यांनी केली. २०१९ साली महात्मा गांधी यांची १५०वी जयंती, २०२२ साली रिझर्व्ह बँकेची ७५ वर्षे, २०२५ साली रिझर्व्ह बँकेची ९० वर्षे आणि २०३५ साली शिखर बँखेची १०० वर्षे या टप्प्यांनुसार निश्चित उद्दिष्ट ठेवून देशातील प्रत्येक व्यक्ती अर्थसाखळीशी जोडली जायला हवी, अशी संकल्पना मोदी यांनी मांडली. मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)