शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
4
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
5
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
6
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
7
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
8
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
9
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
10
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
11
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
12
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
13
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
14
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
15
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
16
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
17
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
18
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
19
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
20
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?

कडव्या धार्मिक गटांवर ‘विशेष सेल’ची नजर

By admin | Updated: June 6, 2014 01:19 IST

सामाजिक विद्वेष पसरविणा:या गटांवर करडी नजर ठेवून कारवाई करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रलयाने विशेष सेल स्थापन करण्याचे ठरविले आहे. हा सेल काही हिंदू संघटनांसह कडव्या धार्मिक गटांवर बारीक लक्ष ठेवेल.

सरकार सक्रिय : पुण्यात तंत्रज्ञाच्या हत्येने जाग
नवीन सिन्हा - नवी दिल्ली
सामाजिक विद्वेष पसरविणा:या गटांवर करडी नजर ठेवून कारवाई करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रलयाने विशेष सेल स्थापन करण्याचे ठरविले आहे. हा सेल काही हिंदू संघटनांसह कडव्या धार्मिक गटांवर बारीक लक्ष ठेवेल.
पुण्यातील तरुण अभियंते शेख एम. सादिक यांची हत्या हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकत्र्यानी केल्याचे तपासात उघड झाल्याच्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. या घटनेनंतर हिंदू संघटनांच्या आक्रमक कडवेपणाच्या बाबतीत हा भयसूचक इशारा मानून गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. 
 हिंदू राष्ट्र सेनेच्या 2क् ते 25 कार्यकत्र्यानी सादिक यांची हत्या केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह चित्र टाकण्यात सादिक यांचा हात असल्याच्या संशयावरून त्यांना लक्ष्य बनविण्यात आले. या संघटनेने रविवारी बंदचे आवाहन केले आहे. हिंदू राष्ट्र सेनेचा संस्थापक धनंजय देसाई याच्यावर अनेक गुन्हे दाखल असताना महाराष्ट्र सरकारने त्याला याआधी अटक का केली नव्हती, असा सवालही केंद्रीय गृह मंत्रलयाच्या अधिका:यांनी केला. 
 
फेसबुक प्रकरण : त्या संघटनांवर बंदी घालण्याचा अधिकार केंद्राचा, वेबसाईट सुरूच
च्पुणो/ मुंबई :  फेसबुकवरील महापुरुषांविषयीच्या अवमानकारक पोस्टनंतर ज्या संघटनेच्या कार्यकत्र्यानी मोहसिन सादिक यांचा खून केला त्या ‘हिंदु राष्ट्र सेना’ या संघटनेवर बंदी घालण्याचा अधिकार आपल्याला नव्हे तर, केंद्र सरकारला असल्याचे पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश माथुर यांनी स्पष्ट केले. तसेच या घटनेचा सविस्तर अहवाल व पुरावे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
च्फेसबुकवर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटण्यास तसेच शहरात तोडफोडीच्या व जाळपोळीच्या घटनांना शनिवारी रात्री सुरुवात झाली होती. शेकडो तरुणांचा जमाव पोलीस ठाण्यांवर चालून गेला होता. पोलिसांनी तातडीने शहरात बंदोबस्त वाढवून परीस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला होता. रविवारीही दिवसभर पूर्ण शहर आणि उपनगरांमध्ये वातावरण तंग होते. सोमवारी शहरातील जवळजवळ सर्वच पोलीस ठाण्यांत शांतता समित्यांच्या बैठका घेण्यात आल्या. 
च्हडपसर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाल्यानंतर सोमवारी रात्री हडपसरमध्ये दोन गट समोरासमोर आले. त्यांच्यात झालेल्या दगडफेकीदरम्यान मोहसीन मोहम्मद सादिक शेख या तरुणाची हत्या झाली. हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकत्र्यांनी त्याला रस्त्यात गाठून जबर मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. मुळचा सोलापूर येथील असलेला शेख हा आयटी पदवीधर असून, त्याची हत्या केल्याप्रकरणी आतापर्यंत 17 जणांना अटक करण्यात आल्याचे माथूर यांनी सांगितले.
 
आक्षेपार्ह पत्रके वाटणा:या तिघांना अटक
आक्षेपार्ह पत्रके वाटप करणा:या हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षासह तिघांना लोणीकाळभोर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिघांना 7 जूनर्पयत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. धनंजय उर्फ मनोज जयराम देसाई (34) या अध्यक्षासह आप्पा बापू गोरे (25), उत्तम विजय गायकवाड (23) अशी आरोपींची नावे आहेत. 
शनिवारी सायंकाळपासून राज्यात तणाव निर्माण झाला आहे. तरीही राज्य सरकार केंद्राकडे साधा रिपोर्टही पाठवत नाही. शिवाय घटनेच्या पाच दिवसांनंतरही आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणारी वेबसाईट सरकारने बंद केलेली नाही, असा आरोप  हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर यांनी केला. ते म्हणाले, सरकार मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे.
 
नुकसान भरपाईची मागणी 
च्मोहसिन सादिक शेख या तरूणाची हत्या करणा:यांवर तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी ऑल इंडिया सेक्युलर फोरम कम्युनॅलिझम कॉम्बॅट या संघटनेने केली आहे. त्यांच्या कुटुंबियांना शासनाने 15 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
 
हिंदु राष्ट्र सेनेची 
माहिती पाठविणार
च्पुण्यामध्ये तणाव निर्माण होण्यास कारणीभूत असलेली परीस्थिती व त्यांची कारणो याबाबचा अहवाल पुणो पोलीस तयार करत आहेत. हा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. शनिवारी रात्रीनंतर नेमके काय काय घडले याचा अहवाल केंद्र शासनाने पुणो पोलिसांकडे मागवला आहे. त्याचवेळी अनेक संघटनांनी या हल्ल्यात बळी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
 
‘सरकार दंगल घडवू पाहतेय!’
- हिंदू जनजागृती समितीचा आरोप
च्मुंबई : पाच दिवस उलटले तरी वेबसाईट ब्लॉक न करणारे आघाडी सरकार राज्यात दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने गुरूवारी पत्रकार परिषदेत केला. 
 
हत्या पोलीस बंदोबस्त असतानाच-पोलीस आयुक्तांची कबुली
च्पुणो : दोन गटांत झालेल्या दगडफेकीत मोहसिन यांचा मारहाण करून खून झाला होता. तो पोलीस बंदोबस्त असताना झाल्याची कबुली खुद्द पुणो पोलीस आयुक्तांनीच गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांच्या या धक्कादायक वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
 
महाराष्ट्र सरकारचा अहवाल
महाराष्ट्र सरकारने सादिक यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रलयाकडे अहवाल पाठविला आहे. पोलिसांनी प्रक्षोभक भाषणांबद्दल देसाईला अटक केली असली तरी त्याचा हत्येशी संबंध असल्याचे सिद्ध झालेले नाही. महाराष्ट्र सरकारने शिफारस केल्याखेरीज केंद्रीय तपास संस्थाकडून तपास केला जाणार नाही, असेही केंद्रीय गृहमंत्रलयाच्या अधिका:याने नमूद केले.