सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत २३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमधील प्रत्येक हालचाली व्हिडीओ कॅमेऱ्यांद्वारे टिपल्या जात आहेत. त्यासाठी जिल्ह्यात ७१ कॅमेरा पथके तैनात करण्यात आली आहेत.चौकाचौकांत घेतल्या जाणाऱ्या जाहीर सभा, चौक सभा, त्यातील भाषणांचे रेकॉर्डिंग आणि उपस्थितांचेदेखील चित्रीकरण या कॅमेऱ्यांद्वारे होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळातील हालचालींची सुरक्षेच्या दृष्टीने चाचपणीदेखील होत आहे. या व्हिडीओ शूटिंगच्या साहाय्याने निवडणूक वातावरणाचा अंदाज घेऊन मतदानाच्या दिवशी कराव्या लागणाऱ्या बंदोबस्ताचे नियोजन करणे शक्य होणार आहे. याशिवाय, मतदान केंद्रांवरदेखील ‘कॅमेरावॉच’ ठेवला जाणार आहे. त्यामुळे मतदानासाठी केंद्रात कोण आले, कोणी मतदान केले, किती वाजता केल याचे चित्रीकरण केले जाणार आहे. परिणामी, निर्भय वातावरणात मतदान करणे शक्य होणार आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. (प्रतिनिधी)
कॅमेरा पथकांची प्रचारावर नजर
By admin | Updated: October 7, 2014 05:36 IST