शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाकडे सकारात्मकतेने पाहा

By admin | Updated: March 2, 2017 01:08 IST

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना सामाजिक भान येते

पुणे : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना सामाजिक भान येते. युवकांनी नकारात्मक विचार न करता जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे. तसेच आपल्या आवडीच्या क्षेत्रात मनापासून व प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास युवकांना नक्कीच यशस्वी होता येईल, असे मत प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे आयोजित ‘उत्कर्ष २0१६-१७’ या सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी नागराज मंजुळे बोलत होते. स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पटकावले, तर उपविजेतेपद नागपूर विद्यापीठाला मिळाले. तसेच सर्वोत्कृष्ट कलाकार पदाचे पारितोषिक पुणे विद्यापीठाच्या शुभांग घाटेकर याला मिळाले. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, बीसीयूडी डॉ. राजा दीक्षित, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, क्रीडा संचालक डॉ. दीपक माने आदी उपस्थित होते.साहित्य व नृत्य गटाचे पारितोषिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पटकावले. तसेच संकल्पना नृत्य स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कल्याणी सरवडकर हिने, तर भारतीय लोकवाद्य गटाचे पारितोषिक शुभांग घाटेकर याने, भित्तीचित्र व घोषवाक्य स्पर्धेचे पारितोषिक सोमेश गुरव याने, तर कवितेचे पारितोषिक अंकुश आरेकर याने मिळवले. संगीत गटाचे व ललित कला गटाचे उत्कृष्ट संघाचे पारितोषिक कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने मिळवले. डॉ. गाडे म्हणाले, स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील विविध सामाजिक व सांस्कृतिक स्तरांतून अनेक विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी एकत्र येता आले, अशा संधी सहज उपलब्ध होत नाही. विद्यार्थ्यांना या स्पर्धांमधून अनेक गोष्टी शिकता आल्या असतील याची मला खात्री वाटते.