शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

कोकणाची नजर मुंबईकडे

By admin | Updated: February 16, 2017 00:28 IST

महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देणारा फटाका शिवसेना-भारतीय जनता पक्षाची महापालिका, तसेच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी युती तुटल्याने उडाला.

वसंत भोसले / कोल्हापूरमहाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देणारा फटाका शिवसेना-भारतीय जनता पक्षाची महापालिका, तसेच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी युती तुटल्याने उडाला. त्याचा सर्वाधिक परिणाम मुंबईचे वारे कोकणातून वाहणाऱ्या प्रदेशावर झाला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा यांची रस्सीखेच अधिकच ताणली गेली, तर त्याचा परिणाम सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेसला संधी मिळवून देण्यात होईल, तर रत्नागिरीत मोठे कोण, शिवसेना की भाजपा हे ठरेल. त्यामुळे ही निवडणूक नारायण राणे यांच्या वर्चस्वासाठी, शिवसेनेच्या अस्तित्वासाठी आणि भाजपाच्या प्रतिष्ठेची ठरली आहे. रत्नागिरीत आजवर युती करून लढलेली शिवसेना आणि भाजपा प्रथमच रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढवत असल्याने, या दोन पक्षांमध्येच अधिक रस्सीखेच रंगली आहे. त्यात शिवसेनेतील अनेक नाराज भाजपाच्या वळचणीला आल्यामुळे या लढतींमध्ये अधिक रंगत आली आहे. गतवेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाची आघाडी केली असली, तरी आतापर्यंतच्या टप्प्यात ही आघाडी अजून पिछाडीवरच आहे.गतवेळी ५७ पैकी ३३ जागा शिवसेना-भाजपा युतीच्या पदरात पडल्या होत्या. त्यात शिवसेनेचा वाटा २५ जागांचा, तर भाजपाचा वाटा केवळ आठ जागांचा होता. मात्र, नगर परिषद निवडणुकीतील यशामुळे भाजपाने जिल्हा परिषदेतही स्वबळ आजमाविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी सर्व पक्षीय नाराजांची मोट बांधण्यात भाजपाला यश आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक टक्कर ही भाजपाकडूनच दिली जाणार आहे.चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीची बाजू काहीशी तोकडी झाली आहे. गतवेळी चिपळूण तालुक्यात ९ पैकी ५ जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे होते. गुहागरचे आमदार भास्कर जाधव, तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी राष्ट्रवादीची ताकद पणाला लावण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे. मात्र, अंतर्गत वादामुळे राष्ट्रवादी मागे पडली आहे. राजापूर तालुक्यात सक्षम असलेली काँग्रेस जिल्ह्यात इतर ठिकाणी मात्र दुबळी आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. अर्थात, या आघाडीकडून फार मोठ्या करिश्म्याची अपेक्षा नाही.