शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

‘बेळगाव’च पाहिज

By admin | Updated: October 21, 2014 00:30 IST

‘काळा दिन’ पाळणारच : महाराष्ट्र एकीकरण समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा े

बेळगाव : केंद्र सरकारने बेळगावचे नामांतर ‘बेळगावी’ करण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना केंद्र सरकारने कर्नाटक सरकारच्या बेळगावी नामकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आगामी १ नोव्हेंबरपासून बेळगाव शहराचे बेळगावी असे कन्नड भाषेच्या शब्दावरून उच्चार करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार राज्याच्या राजपत्रात बेळगावी अशी नोंद करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांसमोर मराठी भाषिकांनी केंद्र व कर्नाटक सरकारच्या निर्णयास विरोध व्यक्त केला. मध्यवर्र्ती समितीचे अध्यक्ष वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका पंचायत कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत केंद्र आणि कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. एकीकरण समितीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १९५३ च्या केंद्राच्या कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वानुसार कोणत्याही शहराचे नामकरण करताना खास कारणाशिवाय बदल करता येत नाही, तसेच शहराचे नाव ऐतिहासिक असेल, तर ते बदलताही येत नाही आणि कोणत्याही शहराचे नाव बदलताना भाषिक तेढ निर्माण झाल्यास ते बदलता येत नाही. केंद्र सरकारने या तत्त्वांचे उल्लंघन करून बेळगावी नामकरणास मान्यता दिली आहे. त्यामुळे हे नामकरण रद्द करावे आणि बेळगाव असेच नाव पूर्ववत ठेवावे.सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना बेळगावचे नामकरण केल्याचे सुप्रीम कोर्टातील वकिलांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली जाणार असून, कायदेशीर लढाई करण्याचे संकेतदेखील एकीकरण समितीने दिले आहेत.‘काळा दिन’ पाळणारचएकीकरण समितीच्या काही मोजक्या नेत्यांना जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी चर्चेसाठी पाचारण केले. त्यावेळी दोन आमदारांसह एकीकरण समितीच्या नेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी १ नोव्हेंबर हा दिन ‘काळा दिन’ म्हणून साजरा करू नका, दुसऱ्या दिवशी साजरा करा, अशी सूचना केली. यावेळी समितीच्या नेत्यांनी ‘आपण १ नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून साजरा करणारच’ असे ठणकावून सांगितले. कर्नाटक सरकार कारवाई करेल, या भीतीने मोर्चामध्ये मराठी भाषिकांच्या मतावर निवडून आलेले महापौर महेश नाईक मात्र गैरहजर होते, हा चर्चेचा विषय होता. बेळगावी नामांतर केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी मोर्चा काढला. एकीकरण समितीच्या नेत्यांनी यावेळी जिल्हाधिकारी एन. जयराम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.