शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीतून पाणी सोडणे लांबणीवर

By admin | Updated: September 1, 2016 19:26 IST

जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यातून खरीप पिकांसाठी उद्या शुक्रवारी पाणी सोडण्याची तयारी जलसंपदा खात्याने केली

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 1 - जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यातून खरीप पिकांसाठी उद्या शुक्रवारी पाणी सोडण्याची तयारी जलसंपदा खात्याने केली होती. मात्र गेल्या दोन दिवसात लाभक्षेत्रातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. म्हणून जायकवाडीतून पाणी सोडणे लांबणीवर टाकण्यात आले आहे. आता पावसाची ओढ पडल्यावरच धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

जायकवाडी धरणाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक मंगळवारी मुंबईत पार पडली. त्यात लाभक्षेत्रातील पिके वाचविण्यासाठी जायकवाडी धरणातून तातडीने खरीपाचे आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय माजलगाव धरणात साडेचार टीएमसी आणि परळी येथील औष्णिक विद्यूत केंद्रासाठीही ५ दलघमी पाणी सोडण्याचे निश्चित झाले. त्यानुसार औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण(कडा) कार्यालयाने जायकवाडीतून पाणी सोडण्याची तयारी केली होती. त्यानुसार २ सप्टेबर रोजी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार होते.

मात्र लाभक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड जिल्ह्यांमधील बहुतेक ठिकाणी मंगळवारी आणि बुधवारी रात्री समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे धोक्यात आलेल्या खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाले. या पार्श्वभूमिवर आता कडा कार्यालयाने जायकवाडीतून खरीपासाठी शुक्रवारी पाणी सोडण्याचे नियोजन पुढे ढकलले आहे. खरीपासाठी पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतलेले आहे. त्यानुसार लाभक्षेत्रातील खरीप पिकांना जायकवाडीतून पाणी मिळणार आहे. परंतु ते आत्ताच देण्याऐवजी आणखी काही दिवसांनी सोडले जाणार आहे.जायकवाडीतून माजलगाव धरणातही साडेचार टीएमसी आणि परळी येथील औष्णिक विद्यूत केंद्राला ५ दलघमी पाणी दिले जाणार आहे. माजलगावसाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून तर परळीसाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडावे लागते. खरीपासाठी दोन्ही कालवे सुरु करण्यात येणार असल्यामुळे माजलगाव आणि परळीसाठीही शुक्रवारपासूनच पाणी सोडण्याचे नियोजन होते. मात्र आता खरीपाची पाणी पाळी लांबल्यामुळे माजलगाव आणि परळीला नंतरच पाणी सोडण्यात येणार आहे. खरीपासाठी पाणी सोडण्याची तयारी पूर्ण झाली होती. परंतु आता काही भागात पाऊस झाला आहे. सध्या पिकांसाठी पाण्याची तेवढी गरज राहिलेली नाही. म्हणून पाणी सोडणे पुढे ढकलले आहे. आणखी काही दिवसानंतर किंवा पावसाची ओढ पडल्यावर लगेचच जायकवाडीतून पाणी सोडले जाईल.- संजय भर्गोदेव, प्रभारी अधीक्षक अभियंता, कडा