शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या घरांची अर्जविक्री लांबणीवर

By admin | Updated: July 20, 2014 02:25 IST

सिडकोच्या माध्यमातून खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पातील घरांसाठी जाहीर केलेली अर्ज विक्रीची तारीख लांबणीवर पडली आहे.

नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून  खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पातील घरांसाठी जाहीर केलेली अर्ज विक्रीची तारीख लांबणीवर पडली आहे.  त्यामुळे 22 जुलैऐवजी आता 1 ऑगस्टपासून अर्जविक्री सुरू करण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याचे समजते. खारघर सेक्टर 36 येथील व्हॅलीशिल्प गृहप्रकल्पाच्या  शेजारी आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी सिडकोने मेगा गृहप्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पात आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटांसाठी  704 तर अल्प उत्पन्न गटासाठी  2590 अशी एकूण 3294 घरे आहेत. यातील घरांच्या किमती 16 ते 24 लाखांच्या घरात असणार आहेत. साधारण मार्च 2016 र्पयत या गृहप्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या प्रकल्पातील घरांसाठी 22 जुलैपासून अर्जविक्री सुरू करण्यात येणार असल्याचे सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी दोन आठवडय़ापूर्वी जाहीर केले होते. मात्र प्रशासकीय स्तरावर याबाबतची तयारी अद्याप पूर्ण न झाल्याने अर्ज विक्रीची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. या प्रकल्पात आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकासाठी 28.55 चौरस मीटरच्या एकूण 704 सदनिका आहेत. त्यांची किमत 15 लाख 78,300 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा दर प्रति चौरस फूट 5136 रूपये इतका आहे. तर अल्प उत्पन्न गटाच्या एकूण 2590 सदनिका आहेत. या गटातील सदनिकाचे एकूण क्षेत्रफळ 34.36 चौ.मी. इतके आहे. (प्रतिनिधी)