मुंबई : सॅण्हडर्स्ट रोड स्थानकाजवळ असलेला १३६ वर्षे जुना हँकॉक पूल पाडण्याचे काम ९ जानेवारीच्या (शनिवार) मध्यरात्रीपासून केले जाणार आहे. जुना असलेला पूल आणि त्याच्या कमी उंचीमुळे रेल्वेला अनेक तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे हा पूल पाडून त्याऐवजी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. नवीन पूल बांधताना त्याची उंची वाढवण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. या कामानिमित्त शनिवारी मध्यरात्री १२.२0 ते रविवारी सायंकाळी १८.२0 असा १८ तासांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ब्लॉकमुळे मुंबईतून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या जवळपास ४२ मेल-एक्स्प्रेस रद्द केल्या जाणार असल्याने चार महिने आधीच करण्यात आलेल्या प्रवाशांच्या नियोजनावर पाणी फेरले जाणार आहे. मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार असल्याने रेल्वे प्रशासनाला जवळपास ८ कोटी रुपये तिकिटांचा परतावा (रिफंड) प्रवाशांना द्यावा लागेल, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली. ब्लॉकमुळे शनिवारी सीएसटीहून शेवटची लोकल कसारासाठी मध्यरात्री १२.१0 वाजता सोडण्यात येईल; तर सीएसटीहून मध्यरात्री साडे बारा वाजता सुटणारी कर्जत लोकल ही मध्यरात्री साडे बारा वाजता भायखळा स्थानकातून सोडण्यात येणार आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत काम सुरू राहणार असल्याने जवळपास १00 लोकल फेऱ्या रद्द होतील. त्याचप्रमाणे कुर्ला किंवा भायखळापर्यंतच मेन लाइनवरील लोकल सेवा सुरू राहील. हार्बर आणि ट्रान्स हार्बरच्या लोकल फेऱ्यांवर मात्र कोणताही परिणाम होणार नाही. रविवारी हार्बरच्या लोकल सीएसटीपर्यंत नियमितपणे धावतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे ज्या प्रवाशांना सीएसटीपर्यंत प्रवास करायचा असल्यास त्या प्रवाशांना हार्बरचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. मेल-एक्स्प्रेसचा शेवटचा थांबा बदलणार१0 जानेवारी रोजी सीएसटी स्थानकात येणाऱ्या आणि सीएसटीहून सुटणाऱ्या ट्रेनचा सुरुवातीचा तसेच शेवटचा थांबा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे, पनवेल, दादर, कल्याण येथे मेल-एक्स्प्रेस गाड्यांना शेवटचा थांबा देण्यात येईल; तर याच स्थानकांतून काही मेल-एक्स्प्रेस सोडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.त्याची माहिती प्रवाशांना रेल्वेच्या नियंत्रण कक्ष तसेच तिकीट खिडक्यांवरही उपलब्ध होईल. फेऱ्या रद्द : रविवारी १00 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी सीएसटीहून कसारासाठी सोडण्यात येणारी पहाटे ४.१२ वाजताची लोकल भायखळा, दादर किंवा कुर्ला स्थानकातून सोडण्यात येईल, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. काम पूर्ण होताच रविवारी सीएसटीहून संध्याकाळी १८.३८ वाजता टिटवाळासाठी लोकल सोडली जाईल. शनिवारी मध्यरात्री सीएसटीला पोहोचणारी शेवटची लोकल ही मध्यरात्री १२.१८ वाजताची आसनगाव असेल. १0 जानेवारी रोजी रद्द गाड्याडाऊन ट्रेन (सीएसटीहून सुटणाऱ्या) भुसावळ पॅसेंजर, पुणे इंद्रायणी सुपरफास्ट एक्स्प्रेस, पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, पुणे डेक्कन एक्स्प्रेस, छत्रपती शाहू महाराज कोयना एक्स्प्रेस, पुणे सिंहगड एक्स्प्रेस, पुणे प्रगती एक्स्प्रेस, नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस, पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, छत्रपती शाहू महाराज सह्याद्री एक्स्प्रेस, मनमाड पंचवटी सुपरफास्ट एक्स्प्रेस, मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस, लातूर एक्स्प्रेस, सोलापूर एक्स्प्रेस, पंढरपूर एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, नागरकोईल एक्स्प्रेस, चेन्नई एक्स्प्रेस, भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, गोरखपूर स्पेशलअप ट्रेन (सीएसटीला येणाऱ्या)पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, पुणे प्रगती एक्स्प्रेस, भुसावळ पॅसेंजर, पुणे डेक्कन एक्स्प्रेस, छत्रपती शाहू महाराज कोयना एक्स्प्रेस, पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस,९ जानेवारी रोजी सुटणाऱ्या गाड्याअप ट्रेन (सीएसटीला येणाऱ्या) पंढरपूर पॅसेंजर, साईनगर शिर्डी पॅसेंजर, सोलापूर एक्स्प्रेस, नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस, लातूर एक्स्प्रेस, छत्रपती शाहू महाराज सह्याद्री एक्स्प्रेस, गोरखपूर स्पेशल८ जानेवारी रोजी सुटणाऱ्या गाड्याअप ट्रेन (सीएसटीला येणाऱ्या) नागरकोईल, चेन्नई मेल, भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेसपालिका व मध्य रेल्वे प्रशासनातर्फे संयुक्त कारवाई करून पूल पूर्णपणे पाडला जाईल. यासाठी ५00पेक्षा जास्त कामगार व कर्मचारी काम करतील. प्रत्येकी ३00 टन वजनाच्या दोन क्रेन कामासाठी वापरल्या जातील.पुलाची उंची कमी असल्याने लोकल फेऱ्या व मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेगावर नियंत्रण होते. तेही हटवण्यात येईल.या पुलाखालून एमटीएनएल, बीएसएनएल कंपनीच्या केबल व अनेक वायर गेल्या होत्या. त्याही काढल्या असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून दिली. त्यामुळे या परिसरातील एमटीएनएल आणि बीएसएनएल लॅण्डलाइनधारकांचे मात्र वांदे होणार आहेत.
लांब पल्ल्याचा प्रवास होणार ‘ब्लॉक’
By admin | Updated: January 8, 2016 02:52 IST