शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

एक अकेली ‘सिंह’

By admin | Updated: October 26, 2014 00:19 IST

पोलीस अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर ते कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात. मनुष्यबळ कमी असले तरी त्याची पर्वा न करता उत्कृष्ट नियोजन करून उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारेही चांगला ‘बंदोबस्त‘ केला

अपुरे मनुष्यबळ : बंदोबस्ताचे उत्कृष्ट नियोजन नरेश डोंगरे - नागपूर पोलीस अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर ते कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात. मनुष्यबळ कमी असले तरी त्याची पर्वा न करता उत्कृष्ट नियोजन करून उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारेही चांगला ‘बंदोबस्त‘ केला जाऊ शकतो. होय, निवडणुकांची रणधुमाळी असू दे की, व्हीव्हीआयपींचे दौरे, गणेशोत्सव असो की नवरात्रोत्सवाचा बंदोबस्त, त्यात तडजोड नाहीच. हे करतानाच गुन्हेगार आणि अवैध धंदेवाल्यांकडेही दुर्लक्ष नाहीच ! त्यामुळेच नागपूर जिल्ह्यात निवडणुकीच्या रणधुमाळीत कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नाही. त्यामुळेच आता पोलीस दलात नागपूर ग्रामीणच्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी केलेल्या बंदोबस्ताची सर्वत्र प्रशंसा होत आहे. अनेक दृष्टीने संवेदनशील मानला जाणारा नागपूर जिल्हा. या जिल्ह्यात लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान अनुचित घटना होण्याची भीती वर्तविली जात होती. निवडणुका म्हटल्या की बोगस मतदार, पैसा, दारू आणि गुंडांच्या वापराची दाट शक्यता. नागपूर जिल्ह्याच्या सीमेला लागून मध्यप्रदेश आहे. या प्रांतातून नागपूर जिल्ह्यात हे सर्व येणार, अशी निवडणुकीच्या अगोदर जोरदार अफवा होती. त्यात विविध गावातील काही नेते आणि त्यांच्या मागेपुढे फिरणारे गुंड यांचे आपसी वैमनस्य प्रचाराच्या निमित्ताने उफाळून येण्याचीही भीती वर्तविली जात होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या ‘बंदोबस्ता‘चे आव्हान ग्रामीण पोलिसांपुढे होते. नागपूर शहरातही विधानसभेचे सहा मतदार संघ आहेत. येथील वातावरणही संवेदनशील होतेच. मात्र, येथे पोलीस आयुक्त आणि सहआयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त आणि पोलीस अधीक्षक दर्जाचे ८ अधिकारी, सुमारे १ हजार पीएसआय ते पीआय आणि ५ हजार पोलीस कर्मचारी होते. साऱ्यांचीच फिल्डींग परप्रांतातून गुंड, बोगस मतदार, शस्त्रसाठा किंवा दारू आणली जाऊ नये म्हणून त्यांनी नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या परप्रांताच्या सीमा सील केल्या. १८ ठिकाणी चेकपोस्ट उभारले. गुंड, दारू, शस्त्र आणि रोकड पकडण्यासाठी रस्त्यारस्त्यावर फिल्डिंग लावली. हे करतानाच कुणाच्याही दडपणाला भीक घालायची नाही. कोणताच गैरप्रकार सहन करायचा नाही. धिटाईने वागायचे, असा सल्लावजा निर्देशही त्यांनी आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले. त्याचे चांगले परिणाम समोर आले. दोन-एक घटनांचे अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व मतदार संघात निवडणूक शांततेत पार पडली. निवडणुकीच्या निकालानंतरही हिंसक घटना घडल्या नाहीत. ‘एक अकेला शेर काफी है जंगल के लिये‘, या उक्ती प्रमाणेच डॉ. सिंग यांनी एक कर्तव्यकठोर अधिकारी परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेसा आहे, हे दाखवून दिले.