शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लंडनचा अभियंता पोहोचला सायकलवरून थेट साताऱ्यात!

By admin | Updated: April 28, 2016 00:20 IST

भारतभ्रमण : आज साताऱ्यातून कोकण दर्शनासाठी करणार कूच

सातारा : खरंतर पेशानं इंजिनिअर असणारी माणसं यंत्रतंत्रात जास्त रमतात. मात्र, लंडन येथील एक इंजिनिअर चक्क भारतीय खेड्यांच्या प्रेमात पडला आहे. म्हणूनच तो सायकलवरून भारतीय ग्रामजीवनाचा अनुभव घेत साताऱ्यात पोहोचलाय. गुरुवारी सकाळी तो साताऱ्यातून महाबळेश्वराकडे कूच करणार असून पुढे तो सायकलवरून कोकणभ्रमंती करणार आहे.ब्रायन अ‍ॅटवूक हे लंडन येथे इंजिनिअर आहेत. सायकलवरून फिरण्याची त्यांना प्रचंड आवड आहे. या छंदापायी ते लंडनहून सुरुवातीला श्रीलंकेत आले. त्याठिकाणी सायकलवरून ते फिरले. आता ते भारतात आले असून संपूर्ण भारतभर ते सायकलवरून फिरणार आहेत. त्यांचा सायकलप्रवास मदुराईपासून सुरू झाला असून पुढे हिमालय, नेपाळपर्यंत ते फिरणार आहेत. सध्या ते सातारा शहरात पोहोचले आहेत. याठिकाणी त्यांचा मुक्काम असून गुरुवारी सकाळी सहा वाजता ते मेढा मार्गे कोकणात जाणार आहेत. सातारा सायकलिंग गु्रप त्यांना मेढ्यापर्यंत सोबत करणार आहे, अशी माहिती आशिष जेजुरीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.खेड्यातून प्रवास करत असताना सायकलवरून शाळेत जाणारी मुलं पाहून आनंद झाला. पण शहरात मात्र सायकल कुठे दिसत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. काश्मिर, हिमालयात संपूर्ण उन्हाळा घालविणार असून पुन्हा दिल्लीतून राजस्थान असा सायकल प्रवास करणार आहेत. त्यानंतर पुन्हा नेपाळला विमानाने जाऊन त्याठिकाणी सायकलवरून फिरणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)खेड्यातील पाहुणचारानं भारावलो...कोणत्याही देशात सायकलवरून प्रवास करताना सुरक्षेचा प्रश्न असतो. भारतातील खेड्यांमध्ये सायकलवरून प्रवास करत असताना येथील लोकांनी असुरक्षितता कधी जाणवू दिली नाही. खेड्यातील लोकांनी केलेल्या पाहुणचारामुळे भारावून गेलो. हाच जिव्हाळा लोकांनी आपल्या माणसांबरोबरही जपावा, अशी प्रतिक्रिया अ‍ॅडवूड यांनी व्यक्त केली.हायवेपेक्षा गावातून फिरायला आवडतं... भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे खेडेगावातून फिरल्याशिवाय खरा भारत कळणार नाही. यासाठी हायवेवरून न फिरता खेडेगावातून प्रवास असल्याचे ब्रायन अ‍ॅटवूड यांनी सांगितले.वाहतुकीचे नियम पाळायला हवेतभारतभर फिरत असताना एक गोष्ट लक्षात आली की, येथील वाहनचालक वाहतुकीचे नियम फारसे पाळत नाहीत. अपघातमुक्त प्रवास करायचा असेल तर प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.