शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा दुहेरी हत्येप्रकरणी दोन जण पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: June 11, 2017 12:43 IST

दुहेरी हत्येप्रकरणी पुणे ग्रामीणचे विशेष तपास पथक (एसआयटी) व पुणे एलसीबीच्या पथकाने संयुक्त कारवाई राबवत दोन जणांना आज पहाटे लोणावळ्यातून ताब्यात घेतले

ऑनलाइन लोकमत

लोणावळा, दि. 11 - लोणावळा शहरासह संपूर्ण महाराष्ट्र हालवून सोडलेल्या लोणावळा शहरातील महाविद्यालयीन युवक युवती यांच्या दुहेरी हत्येप्रकरणी पुणे ग्रामीणचे विशेष तपास पथक (एसआयटी) व पुणे एलसीबीच्या पथकाने संयुक्त कारवाई राबवत दोन जणांना आज पहाटे लोणावळ्यातून ताब्यात घेतले. असिफ शेख (रा. लोणावळा) व त्यांचा अन्य एक साथिदार यांना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. लोणावळ्यातील या डबल मर्डर प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले तरी देखील पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागले नसल्याने मृत युवक आणि युवतीच्या नातेवाईकांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली होती. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी नेमलेल्या विशेष तपास पथक (एसआयटी) व एलसीबीला याप्रकरणी अखेर मोठे यश मिळाले आहे. २ एप्रिल रोजी रात्री लोणावळा आयएनएस शिवाजीसमोरील एस पाॅइंट डोंगरावर सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्गात शिकणारा नगर जिल्ह्यातील सार्थक वाकचौरे व पुणे जिल्हातील श्रुती डुंबरे या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा अंगातील कपडे काढून दगडाने आणि अज्ञात हत्याराने डोक्यात व शरीरावर वार करून खून करण्यात आला होता. ३ एप्रिल रोजी दुपारी ही घटना उघडकिस आल्यानंतर लोणावळा शहरासह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर अधिक्षक राजकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील 14 अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या 8 तपास पथकांनी घटनास्थळ व परिसर पिंजून काढला. खुनामागील वेगवेगळ्या शक्यता पडताळताना जवळपास दीड लाख फोन कॉल्स, मयत युवक व युवती यांचे मित्र, रेकॉर्डवरील गुन्हेगार, फोन कॉल्सवरील संशयित अशा जवळपास दोन हजारांहून अधिक जणांची चौकशी केली. हा खून नेमका कोणी व कोणत्या कारणांसाठी केला असावा याचा मागोवा कसोशीने सुरू होता. मागील काही दिवसांपासून लोणावळ्यातील विविध दारू अड्ड्यांवर पोलीस लक्ष ठेवून होते. आज रविवारी पहाटे या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे विश्वसनीय माहिती मिळाली आहे. आरोपी हे नशेखोर असून किरकोळ पैशासाठी हा खून झाल्याचे समजते.