शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा दुहेरी हत्या प्रकरण : संतप्त नातेवाईकांचा आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: May 1, 2017 17:50 IST

लोणावळा शहरासह संपूर्ण पुणे जिल्हा हादरवून सोडलेल्या लोणावळा शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी यांच्या दुहेरी हत्या प्रकरणाला तब्बल 30 दिवस पूर्ण झालेत.

 ऑनलाइन लोकमत

लोणावळा, दि. 1 - लोणावळा शहरासह संपूर्ण पुणे जिल्हा हादरवून सोडलेल्या लोणावळा शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी यांच्या दुहेरी हत्या प्रकरणाला तब्बल 30 दिवस पूर्ण झालेत. मात्र लोणावळा शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना याप्रकरणातील आरोपींचा काहीच थागपत्ता लागत नसल्याने नातेवाईक संतप्त झालेत. 
 
त्यामुळे पुढील 20 दिवसांत आरोपींचा शोध न घेतल्यास लोणावळ्यात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सार्थक वाकचौरे याचे चुलते कैलास वाकचौरे, भाऊ विक्की वाकचौरे व त्याचे मित्र ऋषीकेश खलाने यांनी निवेदनाद्वारे लोणावळा पोलिसांना दिला आहे. 
 
आरोपींचा शोध घेत या दुहेरी खून प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 14 अधिकार्‍यांच्या समावेश असलेल्या आठ टीम तपास करत आहेत. जवळपास सव्वालाख मोबाइल फोन तपासून काही संशयितांचा सखोल तपास सुरू आहे. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागत नसल्याने तपास यंत्रणेवर आता मृत सार्थकचे नातेवाईक व मित्र परिवार यांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 
 
सदर खून हा चोरीच्या उद्देशाने झाला असावा का?, की एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असावी का? खूनामागे मयत सार्थक व श्रुती यांच्यापैकी कोणाच्या भुतकाळातील घटना आहेत का? ऑनर किलिंगचा प्रकार आहे का? पर्यटनस्थळ परिसरात फिरणारे भुरटे चोर वा गर्दुले यांना हा प्रकार केला असावा का? त्यांचा खून घटनास्थळींच झाला की अन्य कोठे मारुन त्यांना त्याठिकाणी टाकण्यात आले? त्यांचा अंगावरील अंगटी, घड्याळ, पैशांचे पाकीट यापैकी काहीही न नेता फक्त दोघांचे मोबाइल गायब असल्याने त्यांच्या मोबाइलमध्ये असे काय होते? अशा विविध बाबींचा तपास वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून सुरु आहे. 
 
खून करणार्‍यांनी अतिशय शांत डोक्याने व कसलाही पुरावा मागे न ठेवता पोबारा केला असल्याने आरोपींपर्यत पोहोचण्याची कडी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. पुराव्यांअभावी अतिशय आव्हानात्मक बनलेल्या या प्रकरणाचा उलगडा पोलीस कसा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान नातेवाईकांनी पोलिसांना 20 दिवसांचा अवधी देत आंदोलनाचा इशारा दिल्याने तपासाची सुत्रे वेगाने हलण्याची शक्यता आहे.