शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवर 'वर्ल्ड हेरिटेज' म्हणून उदयास येण्याची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 11:36 IST

Lonar Crater : महत्त्वपूर्ण अहवाल भोपाळ येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲण्ड आर्किटेक्टने पुरातत्व विभागाला मधल्या काळात दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लोणार सरोवर परिसर सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून वर्ल्ड हेरिटेज म्हणून उदयास येण्याची क्षमता ठेवणारे ठिकाण आहे. सरोवर परिसरासह लोणार शहराचाही समन्वयातून विकास करण्याची अवश्यकता आहे, अशा स्वरुपाचा महत्त्वपूर्ण अहवाल भोपाळ येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲण्ड आर्किटेक्टने पुरातत्व विभागाला मधल्या काळात दिला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नंतर कोरोना संसर्गामुळे यासंदर्भातील महत्त्वपूर्ण काम रखडले असल्याचे स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲण्ड आर्किटेक्टच्या डॉ. विशाखा कवठेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.देशात सध्या २७ च्या जवळपास सांस्कृतिक हेरिटेज साइट्स आहेत; पण लोणार सरोवर असे ठिकाण आहे की जेथे सांस्कृतिक आणि नैसर्गिक (मिस्कस कल्चर) वर्ल्ड हेरिटेज म्हणून विकसित होण्याची क्षमता आहे. त्यासंदर्भानेच प्राथमिकस्तरावर डॉ. विशाखा कवठेकर आणि रमेश भोळे यांनी लोणार सरोवर परिसरास २३ नोव्हेंबर २०१९ आणि २०२० मध्ये भेट देऊन पाहणी केली होती. त्यासंदर्भातील अनुषंगिक ड्राफ्टही पुरातत्व विभागाकडे दिला आहे.दुसरीकडे लोणार सरोवर क्षती प्रतिबंध व संवर्धनासाठी नागपूर खंडपीठात दाखल याचिकेच्या अनुषंगानेही लोणार सरोवर विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावेत असे खंडपीठाने यापूर्वी स्पष्ट केले आहे. त्याचा संदर्भही भोपाळच्या या स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲण्ड आर्किटेक्टच्या अधिकाऱ्यांच्या भेटीमागे होता.याव्यतिरिक्त लोणार सरोवरात आठही दिशांना असलेली मंदिरे, शुक्राचार्यांच्या कार्यशाळेचे अवशेष, इजेक्टा ब्लॅंकेट (आघातानंतर उडालेला मलबा) यासह अनेक अन्य बाबींचा अंतर्भाव करता येईल. पण हे काम आव्हानात्मक व दीर्घकालीन आहे.

सरोवर व शहराचा विकास साथसाथ व्हावाकेवळ लोणार सरोवराचाच विकास न करता शहराच्या विकासासही प्राधान्य द्यावे लागणार आहे. स्थानिकांचा या प्रक्रियेतील सहभाग महत्त्वाचा राहील. सरोवराशी असलेले स्थानिकांचे पुरातन नाते, भावनिक बंधही तितकेच महत्त्वाचे आहे. परिणामी उभय बाजूंचा समन्वय साधून येथे संवर्धनाचे काम करण्याची संधी आहे. यावरही मोठे काम होण्याची अवश्यकता असल्याचे डॉ. विशाखा कवठेकर म्हणाल्या.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरLonarलोणारbuldhanaबुलडाणा