सोन्याचे नाणे जिंकण्याची संधी : घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणारनागपूर : लोकमत आणि एन्सारा मेट्रो पार्क यांच्यावतीने तीन दिवसीय प्रॉपर्टी आणि गुड होम शोचे आयोजन शुक्रवार, १० आॅक्टोबरपासून सिव्हिल लाईन्स येथील लेडीज क्लबच्या हिरवळीवर करण्यात येणार आहे. उद्घाटन दुपारी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते होईल. सामान्य लोकांचे स्वमालकीचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण व्हावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. एक्स्पोचे सहप्रायोजक सुमंगल विहार आणि हार्मोनी अॅक असून वृंदावन, ग्रीन स्पेस इन्फ्रा, अथर्वनगरी, श्री अप्पास्वामी इन्फ्रास्ट्रक्चर हे सहयोगी प्रायोजक तर पिरॅमिड सिटी व पुष्कर होम्स हे प्रोत्साहनपर प्रायोजक आहेत. नामवंत कंपन्यांचे एकूण ४० स्टॉल राहतील. गेल्या चार वर्षांपासून लोकमत प्रॉपर्टी शोचे आयोजन यशस्वीरीत्या करीत आहे. दरवर्षी ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. नामांकित बिल्डर्सचे स्टॉलएक्स्पोच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना फायदा आणि आवडीचे घरकूल निवडीची संधी आहे. नामांकित बिल्डर्स आपले प्रोजेक्ट आकर्षक योजनांसह ग्राहकांसमोर मांडतील. ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या विविध योजनांची रेलचेल राहील. याअंतर्गत फ्लॅट, रो-हाऊसेस, डुप्लेक्स आणि टाऊनशिपमधील विविध घरांचे बुकिंग तसेच खरेदीची संधी राहील. एक्स्पोमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला सोन्याचे नाणे जिंकण्याची संधी राहील. (प्रतिनिधी)मंजूर प्रॉपर्टीचे एकाच छताखाली प्रदर्शनमंजूर प्रॉपर्टीचे एकाच छताखाली प्रदर्शन होणार आहे. स्वत:चे घर खरेदीचे प्रत्येकाचे स्वप्न असते. बहुतांश लोकांचे प्रत्यक्षात उतरते तर अनेकांचे स्वप्नच ठरते. अवाजवी किंमत आणि कर्जाची अडचण, या मुख्य समस्या आहेत. त्यावर मात करताना सामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकमतचा ‘प्रॉपर्टी एक्स्पो’ हे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. एवढेच नव्हे तर नागपूरच्या आसपास फार्महाऊसची संकल्पना आवर्जून ठेवण्यात आली आहे. तेव्हा मनासारखे घर, जागा, फार्महाऊस या सर्व गोष्टी शोमध्ये मिळणार आहे. अधिक माहितीसाठी आतिश वानखेडे (९९२२४४४२८८), सोलोमन जोसेफ (९५५२५५६८३२), अक्षय कावळे (९५५२५५६८३२) आणि लोकमत भवन, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, रामदासपेठ, नागपूर - २४२९३५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
लोकमतचा ‘प्रॉपर्टी शो’ आजपासून
By admin | Updated: October 10, 2014 01:01 IST