मुंबई : कोणत्याही नैसर्गिक संकटाच्या वेळी मदतीसाठी धावून जाणाऱ्यांमध्ये लोकमत परिवार सदैव अग्रेसर राहिलेला आहे. नेपाळमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले, तर लाखो लोक जखमी झाले. बेघर झालेल्या नेपाळवासीयांची संख्या लाखोंच्या घरात आहे. या महाभयंकर प्रलयात सापडलेल्या नेपाळवासीयांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी व पायावर उभे करण्यास लोकमत परिवाराकडून ४० लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. या रकमेत कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारातून दिलेले २० लाख रुपये आणि तेवढेच २० लाख रुपये व्यवस्थापनाकडून देण्यात आले आहे. किल्लारी आणि गुजरातमधील भूज येथील भूकंप असो वा महाराष्ट्रातील नांदेड, मोवाड आणि बिहारमधील महापूर असो, कारगिलमधील युद्ध असो किंवा महाराष्ट्रातील गारपीटग्रस्त शेतक ऱ्यांना लोकमतने सामाजिक बांधिलकीतून मदत करण्यासाठी आपली जबाबदारी नेहमीच पार पाडली आहे. (प्रतिनिधी)
भूकंपग्रस्तांना ‘लोकमत’चा मदतीचा हात
By admin | Updated: May 3, 2015 05:22 IST