शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

लोकमत वुमेन समिट २०१४

By admin | Updated: December 5, 2014 00:00 IST

प्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी यांच्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमात रंगत आली.महिला ‘ट्रॉफी’ आहेत या भावनेतून आजही त्यांच्याकडे पाहिले जाते. लग्नाच्या वेळीस वर रितसर पैसे देऊन वधूला आपल्याकडे आणण्याची आजही केनियामध्ये प्रथा आहे. महिलांनी मुलालाच जन्म देण्याचा आग्रह केला जात होता.मुलीच जास्त काळजी घेतात याची जाणीव होत आहे. मुलींना शिक्षण देण्याचे प्रमाण वाढत ...

प्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी यांच्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमात रंगत आली.

महिला ‘ट्रॉफी’ आहेत या भावनेतून आजही त्यांच्याकडे पाहिले जाते. लग्नाच्या वेळीस वर रितसर पैसे देऊन वधूला आपल्याकडे आणण्याची आजही केनियामध्ये प्रथा आहे. महिलांनी मुलालाच जन्म देण्याचा आग्रह केला जात होता.मुलीच जास्त काळजी घेतात याची जाणीव होत आहे. मुलींना शिक्षण देण्याचे प्रमाण वाढत आहे असे केनियाच्या भारतातील उच्चायुक्त फ्लॉरेंस इमिसा विचे यांनी सांगितले.

महिलेला संधी द्या तुमची निवड कधीही चुकणार नाही. कारण महिला विचार करताना मेंदूबरोबरच हृदयापासून विचार करते असे युगांडाच्या भारतातील उच्चायुक्त एलिझाबेथ नापेयॉकन म्हणाल्या. महिलेला संधी मिळाली की ती नेहमीच चांगले काम करते असे त्यांनी सांगितल्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

नक्षलग्रस्त गडचिरोलीत "आम्ही आमच्या आरोग्यासाठी" संस्थेच्या माध्यमातून शुभदा देशमुख "सौ. ज्योत्स्ना दर्डा कार्यगौरव" पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ठरल्या. गडचिरोली भागातून शहरात आलेल्या आदिवासींना अजूनही आपले नागरिक मानले जात नाही. आम्ही आदिवासी भागात काम सुरू केल्यावर अनेक गोष्टी घडल्या स्त्रिया बोलत्या झाल्या. त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहनाची गरज असून "लोकमत वुमेन समिट"सारख्या उपक्रमांतून अधिक बळ मिळेल असे शुभदा देशमुख म्हणाल्या.

"शाश्वत" संस्थेच्या माध्यमातून आदिवासींच्या विकासासाठी काम करणा-या कुसुमताई कर्णिक या "मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव" पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. आदिवासी समाजातील नागरिक अन्य समाजापेक्षा अतिशय पुढे गेलेले आहेत. त्यांच्यासोबत काम करताना कधी उपाशी राहिलो नाही. लोकमतच्या या उपक्रमात सहभागी होऊन खूप छान वाटले या कार्यक्रमाद्वारे आपण एक पाऊल पुढे टाकले आहे असे कुसुमताईंनी यावेळी सांगितले.

भारतीय महिलांमध्ये सर्व गोष्टी करण्याची अफाट क्षमता आहे. नोकरी करीत असूनही कुटुंबातील प्रत्येक जबाबदारी त्या उत्कृष्टपणे सांभाळतात. त्यांच्यामध्ये जी शक्ती आहे ती जगातील कुठल्याही महिलेमध्ये पाहायला मिळणार नाही. त्यामुळे आपल्यातील ‘आंतरिक’ शक्तीला ओळखा असा मूलमंत्र प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन हिने महिलांना दिला.

कुठलाही व्यवसाय वाढला की घरातील मंडळींची मदत लागतेच माझीही मदत मागितली गेली. शिक्षण कमी होते तरीही चॅलेंज म्हणून जबाबादारी स्वीकारली आणि यशस्वी झाले असे संजय काकडे ग्रुपच्या उपाध्यक्ष उषा काकजे यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान नृत्याविष्कार सादर करताना अदिती भागवत

मदतीला कोणीही नसते कौतुकही होत नाही; तरीही महिला म्हणजे कुटुंबाची सीईओ असते. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक घाव झेलत स्वत:ला घडवा असा सल्ला अभिनेत्री लिसा रे यांनी महिलांना दिला.

‘घरात स्कोप नसल्याने देवेंद्र बाहेर आक्रमक असतात.’महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या घरात महिलाशक्तीचा आवाज किती बुलंद आहे हे एका वाक्यात त्यांच्या पत्नी यांनी अमृता फडणवीस सांगितले आणि सभागृहात एकच हशा उसळला.

महिलांचे मनोबल उंचावत त्यांचा आत्मविश्वास जागवित निश्चयाचे बळ त्यांच्या मनात दृढ करण्यासाठी माझी सुविद्य पत्नी सौ. ज्योत्स्ना दर्डा यांच्या कल्पनेतून १९९९ मध्ये ‘लोकमत सखी मंच’ची स्थापना झाली असे खासदार व लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन विजय दर्डा यांनी सांगितले. या वर्षीच्या ‘वुमेन समिट’ची कल्पना ‘वर्किंग वुमेन अ‍ॅँड देअर इश्यूज’ आहे. महिलांचे हे प्रश्न केवळ आपल्याकडेच नाहीत तर त्याचे स्वरूप वैश्विक आहे असेही ते म्हणाले.

महिलांच्या सबलीकरणासाठी ‘सारे आकाश तुमचे’ या संकल्पनेचा केलेला जागर आणि ‘संकोच आता... बास...’ असे सांगत ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देण्याच्या केलेल्या निर्धारातून महिलांमध्ये आत्मविश्वासाचे बळ प्रस्थापित करीत अत्यंत उत्साही वातावरणात हा सोहळा रंगला. या परिषदेत महिलांच्या प्रश्नांवर जागर करतानाच विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणार्‍या महिलांचा सन्मान करण्यात आला.

लोकमत माध्यम समूहाच्या वतीने एनईसीसीच्या सहकार्याने आयोजित "लोकमत वुमेन समिट २०१४" ही राष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली. दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना (डावीकडून) निपुण शर्मा अ‍ॅड. एस.के. जैन एलिझाबेथ नापेयोक खासदार विजय दर्डा फ्लॉरेन्स इमिसा वेचे उषा काकडे व अमृता फडणवीस