शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आज रंगणार ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’चा सोहळा, ‘पंचायत राज’साठी पहिलाच पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 05:02 IST

गावाची शान असलेल्या राज्यातील १३ सरपंचांना बुधवारी ‘लोकमत सरपंच आॅफ द इयर’चा मुकुट प्रदान करण्यात येणार आहे़

मुंबई : गावाची शान असलेल्या राज्यातील १३ सरपंचांना बुधवारी ‘लोकमत सरपंच आॅफ द इयर’चा मुकुट प्रदान करण्यात येणार आहे़ मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात भव्य सोहळ्यात ज्येष्ठ मंत्र्यांच्या हस्ते १३ सरपंचांचा गौरव करण्यात येणार आहे़गावांच्या विकासासाठी धडपडणाऱ्या सरपंचांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी ‘लोकमत’ने ‘सरपंच अ‍ॅवॉर्ड’ सुरू केले आहेत. सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा राज्यातील व पंचायत राज व्यवस्थेतीलही हा पहिलाच पुरस्कार आहे. ‘बीकेटी टायर्स’ हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक असून, ‘पतंजली आयुर्वेद’ हे प्रायोजक, तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत.राज्यातील १८ जिल्ह्यांमधून या पुरस्कारांसाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल करण्यात आले होते़ त्यातील गाव बदलाची धडाडी घेऊन आश्वासक काम उभे करणाºया सरपंचांना जिल्हा पातळीवर पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे़ जिल्हास्तरावरील विजेत्यांमधून राज्यस्तरावरील पुरस्कारांसाठी नामांकने पाठविण्यात आली होती़ आता राज्यस्तरावर नामवंत ज्युरी मंडळ राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी सरपंचांची निवड करणार आहेत.बुधवारी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि रणजीत पाटील यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ‘लोकमत’च्या एडिटोरीयल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, लोकमत मीडियाचे मुख्य संपादक व ज्युरी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळारंगणार आहे़आदर्श गाव समितीचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार, प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे प्रमुख मकरंद अनासपुरे, प्रदर्शनाच्या वाटेवर असलेला ‘रणांगण’ सिनेमाचा नायक स्वप्निल जोशी व नायिका प्रणाली घोगरे, अभिनेत्री स्पृहा जोशी, तसेच बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार कार्यक्रमाचे विशेष निमंत्रित असतील. बापमाणूस टीव्ही मालिकेतील कलावंतही उपस्थित राहणार आहेत.