शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ला तीन उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

By admin | Updated: November 19, 2015 02:29 IST

राज्य शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले असून, यात ‘लोकमत’ला तीन पुरस्कार मिळाले आहेत. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री डॉ. मुझफ्फर हुसैन यांना

मुंबई : राज्य शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले असून, यात ‘लोकमत’ला तीन पुरस्कार मिळाले आहेत. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री डॉ. मुझफ्फर हुसैन यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. एक लाख रुपये व मानचिन्ह असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी २०१४ सालच्या जीवन गौरव आणि उत्कृष्ट पत्रकारितेसाठीच्या राज्यस्तरीय आणि विभागीय पुरस्कारांची घोषणा केली. १ डिसेंबर, २०१५ रोजी सायं. ६ वा. सह्याद्री अतिथीगृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. २०१४ साठीच्या राज्य आणि विभागीय स्तरावरील उत्कृष्ट पत्रकारितेची ‘लोकमत समूहा’ला मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे :राज्यस्तरीय पुरस्कार : बाबुराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी): मुकेश रामकिशोर शर्मा, दै.लोकमत समाचार, गोंदिया. ४१ हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र). विभागीय स्तरावरील पुरस्कारग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग : इंदुमती गणेश (सूयर्वंशी), वार्ताहर-उपसंपादक, दै.लोकमत, कोल्हापूर; ४१ हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र). लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग : हर्षनंदन सुरेश वाघ, प्रतिनिधी, दै.लोकमत, बुलडाणा; ४१ हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र) जाहीर झाले आहेत.