शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार ‘लोकमत पार्लमेंटरी अ‍ॅवॉर्ड्स’

By admin | Updated: July 10, 2017 05:28 IST

देशभरातील दिग्गजांना ‘लोकमत समूहा’तर्फे ‘लोकमत पार्लमेंटरी अ‍ॅवॉर्ड्स २०१७’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संसदीय कामकाजात अत्यंत मोलाची भूमिका बजावणाऱ्या देशभरातील दिग्गजांना ‘लोकमत समूहा’तर्फे ‘लोकमत पार्लमेंटरी अ‍ॅवॉर्ड्स २०१७’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बुधवार, १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता नवी दिल्लीत मौलाना आझाद रोडवरील विज्ञान भवनातील ‘प्लेनरी’ सभागृहात हा सोहळा रंगणार आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री व्यंकय्या नायडू, राज्यसभेचे उपसभापती प्रो. पी. जे. कुरियन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, खासदार डॉ. मुरली मनोहर जोशी, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील या मान्यवरांची विशेष उपस्थिती ‘लोकमत पार्लमेंटरी अ‍ॅवॉर्डस’ सोहळ्याला लाभणार आहे. ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा हे या सोहळ््याचे निमंत्रक आहेत.