शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३: कोणता आयपीएस अधिकारी तुम्हाला वाटतोय सर्वात प्रॉमिसिंग?; मत नोंदवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 13:45 IST

आय पी एस (प्रॉमिसिंग) या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.

लोकसेवा/समाजसेवा, आयएएस, आयपीएस, राजकारण, शिक्षण, क्रीडा, कृषी, उद्योग/व्यवसाय, वैद्यकीय अशा क्षेत्रांमध्ये आपल्या उल्लेखनीय कामगिरीने जगभरात महाराष्ट्राचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या गुणवंतांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. आय पी एस (प्रॉमिसिंग) या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.

५० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणारे अधिकारीडॉ. हरी बालाजी. एन पोलिस उपायुक्त, परिमंडळ १, मुंबईडॉ. हरी बालाजी. एन हे २०१३ चे आयपीएस अधिकारी आहेत. सप्टेंबर २०२१ पासून ते मुंबईतील महत्त्वपूर्ण आणि अतिसंवेदनशील विभागातील परिमंडळ एकचे उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.  अमरावतीचे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. विविध सामाजिक उपक्रमांमुळे ते नेहमीच चर्चेत असायचे. बीड, पालघरमध्येही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गडचिरोलीला असताना, २०१८ साली नक्षलवादी व पोलिसांमध्ये एका घटनेदरम्यान चकमक उडाली. यावेळी डॉ. हरी बालाजी यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेत ‘ऑपरेशन नक्षल’अंतर्गत घटनास्थळी ५० नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. विशेष म्हणजे या ऑपरेशनवेळी एकाही पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला नाही. या कार्याबाबत त्यांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

मल्टी मार्केटिंग स्कॅम उघडकीस आणणारे हातनुरुल हसन, पोलिस अधीक्षक, वर्धापोलिस अधीक्षक नुरुल हसन नागपूर येथे परिमंडळ १ मध्ये पाेलिस उपायुक्त म्हणून रुजू झाले. तेथे १०० कोटी रुपयांचा मल्टी मार्केटिंग स्कॅम उघडकीस आणला. या कारवाईनंतर नुरुल हसन हे नाव महाराष्ट्राला माहीत झाले. कुख्यात गुंड आबू खान याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करून सतत सहा महिने पाठलाग करून त्यास अटक करत संपूर्ण गँगचा सफाया केला. दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी १०० गुन्हेगारांना तडीपार केले, ३० गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली. ४० गुन्हेगारांवर मोक्का अंतगर्गत कारवाई केली. त्यांची पोलिस अधीक्षक म्हणून वर्धा येथे पदोन्नती झाली. त्यांनी गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का लावला. एमडी तस्करांना बेड्या ठोकल्या. वाळू माफियांवर सर्वात मोठी कारवाई करून ७० ते ८० ट्रक जप्त केले. क्राईम नियंत्रणासाठी क्यूआर कोड तयार केले.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

चंद्रपूरमधील विद्यार्थी गेले थेट एव्हरेस्टवरसुहेल शर्मा, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ३, पुणे शहरसुहेल शर्मा हे मूळचे दिल्लीतील असून शालेय शिक्षण अमृतसर येथे झाले आहे. सिमला येथून त्यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग केले. २०१२ मध्ये ते आयपीएस झाले. त्यांची पहिली नियुक्ती चंद्रपूर येथील नक्षलग्रस्त भागात झाली होती. कोल्हापूर येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक, सांगली येथे पोलिस अधीक्षक. एटीएस मुंबई येथे एक वर्ष पोलिस उपायुक्त, त्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक गव्हर्न्मेंट पॉलिसी यावर एक वर्ष फलोशिप त्यांच्या नावावर आहे. सध्या पुणे पोलिस आयुक्तालयात पोलिस उपायुक्त म्हणून ते कार्यरत आहेत. मिशन शौर्य या उपक्रमाचे ते मेंटॉर आहेत. मिशन शौर्य हा राज्यातील पहिला असा उपक्रम होता, ज्यात चंद्रपूर जिल्ह्यातील दहा विद्यार्थ्यांना एव्हरेस्टसाठी पाठवण्यात आले. या उपक्रमाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनीही कौतुक केले.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

समुपदेशनाव्दारे काम करणाऱ्या सिंघमचा दबदबातेजस्वी सातपुते, पो. उपायुक्त, पोलिस मुख्यालय २, मुंबईतेजस्वी सातपुते या २०१२ च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. नोव्हेंबरपासून मुंबई पोलिस दलातील मुख्यालय २ येथे त्या पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी, सोलापूर जिल्ह्यात काम करताना सातपुते त्यांच्या 'ऑपरेशन परिवर्तन'ने अनेकांना अवैध धंद्यांपासून दूर करून  चांगल्या व्यवसायाकडे वळवले. याअंतर्गत जवळपास ६०० पैकी ४५० कुटुंबीयांचे यशस्वीपणे नोकरी, किराणासह विविध व्यवसायात सक्रियपणे 'कायमस्वरूपी' पुनर्वसन केले आहे. ६५७ तरुणांना नोकरी उपलब्ध करून दिली. आतापर्यंत ३००० हून जास्त समुपदेशनाची सत्रे पोलिस दलातील कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने घेण्यात आली आहेत. लेडी सिंघम म्हणून त्यांची ओळख असून आपल्या कामाव्दारे त्या छाप पाडत आहेत.मत देण्यासाठी येथे क्लिक करा

'कॉर्नर मीटिंग मॉडेल' विकसित केलेविक्रम देशमाने पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीणविक्रम देशमाने यांनी दहशतवादविरोधी पथकामध्ये अर्थात एटीएसमध्ये कार्यरत असताना अत्युत्कृष्ट कामगिरी करत गुप्तचर यंत्रणेद्वारे माहिती काढून केलेल्या तपासामुळे दहशतवादाचे मोठे नेटवर्क खंडित झाले. नागरिकांमध्ये धार्मिक सलोखा वाढीस लागावा म्हणून मालेगाव, नाशिक, मुंब्रा, ठाण्यातील राबोडी, मालवणी, मुंबईतील धारावी अशा परिसरात 'कॉर्नर मीटिंग मॉडेल' विकसित करून अंमलात आणले. याचा मोठा फायदा सामाजिक सलोखा प्रस्थापित होण्यासाठी झाला. सांगलीमधील दुहेरी हत्याकांडांचे दोन गुन्हे उघडकीस आणून १८ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. चड्डी-बनियन टोळीवर झालेल्या एन्काऊंटरमुळे कारवाईमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट शोध पुरस्कार मिळाला. हरवलेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेण्याच्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणांचा त्यांनी शोध लावला आहे.मत देण्यासाठी येथे क्लिक करा 

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023