शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ साहित्य पुरस्कारांची घोषणा!

By admin | Updated: November 18, 2015 03:20 IST

मराठी साहित्यविश्वात मोलाची भर घालणाऱ्या सारस्वतांचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या यंदाच्या मोहर ग्रुप प्रस्तुत ‘लोकमत साहित्य पुरस्कारां’ची घोषणा करण्यात

पुणे : मराठी साहित्यविश्वात मोलाची भर घालणाऱ्या सारस्वतांचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या यंदाच्या मोहर ग्रुप प्रस्तुत ‘लोकमत साहित्य पुरस्कारां’ची घोषणा करण्यात आली आहे. लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रा. चिं. ढेरे यांना ‘लोकमत जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरवण्यात येणार आहे. १ लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. याखेरीज नऊ साहित्यप्रकारांतील प्रतिभावंत लेखकांचा ‘लोकमत साहित्य पुरस्कारा’ने सन्मान होणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हॉटेल हयात रिजेन्सी, नगर रस्ता येथे होणार आहे. या वेळी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे व नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक अजय अंबेकर, मोहोर ग्रुपचे अध्यक्ष व घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. समारंभाचे अध्यक्षस्थान लोकमत समूहाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा भूषवणार आहेत.विविध वाङ्मय प्रकारांत पुरस्कारप्राप्त साहित्यिकांमध्ये कथा विभागात सतीश तांबे, कादंबरी विभागात नामदेव माळी, कविता विभागात श्रीधर नांदेडकर, ललित गद्य विभागात अतुल धामनकर, ललितेतर गद्य विभागात एम. डी. रामटेके, चरित्र-आत्मचरित्र विभागात अरविंद जोग, वैचारिक समीक्षा विभागात प्रा. प्रकाश पवार, अनुवाद विभागात धनश्री हळबे, विज्ञान विभागात पाणी विषय केंद्रस्थानी धरून देशोदेशीचे पाणी व इतर चार पुस्तके याबद्दल मुकुंद धाराशिवकर यांचा समावेश आहे. प्रत्येक वाङ्मयप्रकारातील विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठासाठी चित्रकार सतीश भावसार यांची निवड करण्यात आली आहे. ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. लोकमत साहित्य पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. लोकमत साहित्य पुरस्कारांतर्गत गेल्या वर्षभरात प्रकाशित झालेल्या राज्यभरातील साहित्यकृती विचारात घेण्यात आल्या होत्या. परीक्षक मंडळात प्रा. डॉ. द. ता. भोसले, निरंजन घाटे, अरुणा ढेरे, नीरजा आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)