शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
4
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
5
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
6
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
8
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
9
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
10
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
11
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
12
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
13
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
14
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
15
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
16
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
17
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
18
अनोखा विक्रम! फक्त एका दिवसात १८ लाखांहून अधिक महिलांचा बसमधून मोफत प्रवास
19
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
20
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?

लोकमत शुभवर्तमान - माळरानावर पिकवली आकांक्षा काकडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2017 08:54 IST

कीकडे कर्जबाजारीपणा आणि बाजारभावातील अनियमतता असताना त्याच परिस्थितीत दुसरीकडे तालुक्यातील कैलास वाजे या खेडभैरव गावातील शेतकऱ्याने जिद्दीच्या बळावर दगडाळ

लक्ष्मण सोनवणे

बेलगाव कुऱ्हे (नाशिक), दि. 15 - एकीकडे कर्जबाजारीपणा आणि बाजारभावातील अनियमतता असताना त्याच परिस्थितीत दुसरीकडे तालुक्यातील कैलास वाजे या खेडभैरव गावातील शेतकऱ्याने जिद्दीच्या बळावर दगडाळ, मुरमाट पडीक अन दुर्लक्षित असलेल्या माळरानावर एक एकरच्या शेतीत बंगलोर येथील नेत्रा सिड्सची संकरित आकांक्षा या सुधारित वाणाची लागवड करून आधुनिक पद्धतीने काकडीचा यशस्वी प्रयोग उभा केला आहे.

यामुळे दररोज साठ ते सत्तर या काकडीच्या जाळ्या नाशिकला विक्रीसाठी ते नेतात. यातून त्यांना दररोज उत्पन्न देखील चांगले मिळत आहे. त्यांनी बँगलोर येथील नेत्रा सिड्सच्या मदतीने किरण मांडे यांनी आधुनिक शेती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले असून ते शेतीबद्दलचे उपयुक्त असे ज्ञान त्यांना देत आहेत.या प्रयोगामुळे त्यांना विक्र मी उत्पादन मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. शेतीविषयक अभ्यास करून स्वत:च्या पोटच्या मुलासारखी काकडीची काळजी घेत त्यांनी निसर्गाच्या चहूबाजूने येणाऱ्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. गेल्या काही वर्षाच्या कालखंडात निसर्गाने शेतकऱ्यांची हवी तशी साथ दिलेली नसतांना देखील त्यांनी कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता ड्रीप पद्धतीने काकडी जगविली आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात नक्कीच असतो. याप्रमाणे नवीन प्रयोगात त्यांची पत्नी वंदना देखील त्यांना सातत्याने मदत करीत असतात

इगतपुरी तालुक्यात शेतकऱ्यांपुढे अनेक संकटे उभी असतांना तालुक्यातील या शेतकऱ्याने खचून न जाता डबघाईला आलेली कौटुंबिक अर्थव्यवस्था सावरण्यासाठी भाजीपाला शेतीचा नवा पर्याय निवडला. अनेक पारंपारीक पिकांचे काटेकोर नियोजन करत नवनवीन प्रयोग केले. त्यातून आर्थिक घडी बसवली. त्यांच्या या प्रयोगाला यश आले. त्यामुळे इतर शेतकरीही आता त्यांची बाग पाहण्यासाठी रांगा लावत आहेत. वाजे यांच्या कष्टाला मिळालेली ती पावतीच आहे!थंडीत देखील काकडीची वाढ झाली असून अनेक फुटवे आले आहेत. प्रत्येक फुटव्यांच्या पेर्यास फळे लागली असून वाजे यांना भरघोस उत्पन्न मिळाले आहे.नवीन तंत्रज्ञाणाचा अवलंब करीत ह्या जातीच्या काकडीची लागवड केली असून सेंद्रिय रबडी खतांचा वापर करून पिकांना जीवदान दिले आहे.या हिरवट पांढर्या काकडीला भरपूर फुटवे असून लंब दंडगोलाकार १६ ते १८ सेमी लांबीची फळे आलेली आहे. उत्तम रोगप्रतिकारक शक्ती आहे.- एकीकडे अस्मानीचा थैमान आणि दुसरीकडे नवनवीन सरकारी धोरणांची कात्री अशातच दलालांचे भाववाढीमागील धोरण यामुळे कोंडी होते. अशा परिस्थितीमध्ये खचून न जाता अपयशाची कारणे देण्यापेक्षा मी शेतीविषयक अभ्यास केला आणि पडीक माळरानावर इतरांपेक्षा वेगळा विचार करत आकांक्षा काकडीचा नवीन प्रयोग यशस्वी केला; परिणामत: विक्र मी उत्पादनाने पुरेपूर उत्पन्न मिळत आहे.- कैलास वाजे ,शेतकरी खेडभैरव