लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘सर्वांसाठी ऊर्जाच घडवेल देशाचे भविष्य’ या संकल्पनेवर आधारित ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे ‘लोकमत ऊर्जा समिट २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या आर्थिक विकासातील ऊर्जा क्षेत्राचा वाटा आणि भविष्यातील दीर्घकालीन योजना, अशा महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाशझोत टाकण्यात येईल. शनिवार, १० जून रोजी मुंबईत हा कार्यक्रम पार पडेल.‘लोकमत’ मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, ‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन विजय दर्डा, केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांचा या समिटमध्ये सहभाग असेल. ‘ऊर्जा क्षेत्रातील संधी आणि आव्हाने’, ‘रिन्युएबल एनर्जी : ट्रान्सफॉर्मिंग द इंडियन इलेक्ट्रिसिटी लॅण्डस्केप’ आणि ‘फायनान्शियल हेल्थ आॅफ स्टेट डिस्कॉम्स-महाराष्ट्र प्रॉस्पेक्टिव्ह’ या विषयांवर स्वतंत्र परिसंवादही होणार आहे.
मुंबईत आज रंगणार ‘लोकमत ऊर्जा समिट २०१७’
By admin | Updated: June 10, 2017 03:17 IST