शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इफेक्ट - त्या बेवारस इसमाची 'सावली केअर सेंटर'ने घेतली जबाबदारी

By admin | Updated: July 8, 2016 16:11 IST

गेल्या सहा-सात महिन्यांपासून फुटपाथवरच रहाणा-या हेमंत साळोखे नावाच्या व्यक्तीचे वृत्त आजच्या शुक्रवारच्या हॅलो कोल्हापूर पुरवणीमध्ये प्रसिद्ध झाले होते.

मुरलीधर कुलकर्णी, ऑनलाइन लोकमत 

 
कोल्हापूर, दि. ८ - जमिनीचं अंथरूण आणि आभाळाचं पांघरूण घेऊन गेल्या सहा-सात महिन्यांपासून फुटपाथवरच रहाणा-या हेमंत साळोखे नावाच्या व्यक्तीचे वृत्त आजच्या शुक्रवारच्या हॅलो कोल्हापूर पुरवणीमध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत कोल्हापुरातील 'सावली केअर सेंटर' या सामजिक संस्थेने त्वरीत प्रतिसाद दिला. सावली सेंटरने त्या इसमाला आपल्या संस्थेत आज दाखल करुन घेतले.  
 
अंगावरच्या कपड्यांचीही त्याला शुद्ध नाही. कुणीतरी दिलेल्या शिळ्यापाक्या अन्नावरच त्याची गुजराण सुरू होती. पावसाळा सुरू झाल्यापासून मात्र त्याची अवस्था फारच दयनीय झाली. 
 
दसरा चौकाजवळील वाहतूक नियंत्रण केंद्रापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या फुटपाथवर त्याचा मुक्काम होता. तो येथे कधी आला, कसा आला, याबद्दल त्याला विचारले तर तो फारसे काही बोलत नाही; परंतु रस्त्यावरून येणा-जाणार्‍यांना मात्र तो कधीच, कसलाही त्रास देत नाही. कोणी काही खायला दिले तर तो कसुनसे हसून नमस्कार करतो. 
 
पावसाळा सुरू झाल्यापासून मात्र त्याची अवस्था फारच दयनीय झाली आहे. मुसळधार पावसात दिवसभर तो फुटपाथवरच बसून असतो. रात्र झाली की तेथेच आडवा होतो. अंगावरचे कपडे, पांघरूण ओले चिंब झाले तरी त्याची त्याला शुद्ध नाही. त्याच्या हालचालीही आता पूर्वीपेक्षा मंदावल्या आहेत, असे आजूबाजूचे लोक सांगतात. अनेक दिवस अहोरात्र पावसात भिजल्याने त्याच्या अंगात तापही मुरला असावा, अशी शंका येते. त्याचे दिवस-रात्र भिजणे असेच पुढे चालू राहिल्यास त्याच्या जिवालाही धोका होऊ शकतो. 
 
या अश्राप जिवाला आज निवार्‍याची गरज असून, त्याच्या पुनर्वसनासाठी समाजातील एखाद्या दानशुराने किंवा एखाद्या सेवाभावी संस्थेने पुढे येण्याची गरज आहे. 
 
नाव विचारले तर हेमंत साळोखे म्हणून सांगतो. 
 
घर कुठे आहे? असे विचारले तर रंकाळ्याजवळ म्हणतो.
 
माझी एक संजना नावाची मावशी साने गुरुजी वसाहतीत राहते, असेही तो सांगतो; पण त्या मावशीचे आडनाव काय? तिचे घर नेमके कुठे आहे? असे विचारले तर त्याला काहीच सांगता येत नाही.
 
घरी कधी जाणार? म्हणून विचारले तर 'सच्या मला न्यायला येणार आहे. तो आला की मी दिवाळीला घरी जाणार' असे भाबडेपणाने तो सांगतो. 
 
हा सच्या कोण आणि तो नेमका कधी येणार? हे मात्र त्याला सांगता येत नाही.