शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत दीपोत्सव २०१४

By admin | Updated: October 16, 2014 00:00 IST

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपोत्सवच्या संपादिका अपर्णा वेलणकर यांनी केले.दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे होणा-या अपघातामध्ये सगळ्यात जास्त ईजा होतात त्या लहान मुलांना. दरवर्षी आमच्याकडे फटाक्यांमुळे डोळ्यांना ईजा झालेली मुलं येतात. येत्या दिवाळीमध्ये फटाके न वाजवता सगळ्यांनी दीपोत्सवचा सुंदर अंक वाचून दिवाळीचा उत्सव साजरा करावी असे आवाहन नेत्र शल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.दीपोत्सवमधील लेखाचा ...

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपोत्सवच्या संपादिका अपर्णा वेलणकर यांनी केले.

दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे होणा-या अपघातामध्ये सगळ्यात जास्त ईजा होतात त्या लहान मुलांना. दरवर्षी आमच्याकडे फटाक्यांमुळे डोळ्यांना ईजा झालेली मुलं येतात. येत्या दिवाळीमध्ये फटाके न वाजवता सगळ्यांनी दीपोत्सवचा सुंदर अंक वाचून दिवाळीचा उत्सव साजरा करावी असे आवाहन नेत्र शल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.

दीपोत्सवमधील लेखाचा उल्लेख करत प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर म्हणाले ट्रकच्या मागे लिहिलेल्या कलात्मक चित्रांवर खास लिहिण्यात आलेला दीपोत्सवमधील लेख हा वैशिष्ट्यपूर्ण असून ट्रक आर्टवर बहुदा प्रथमच लिहिलं गेलं असावं.

व्हिडीयो कॅसेट विक्रीचं दुकान ते चार राष्टीय पातळीवरील पुरस्कार मिळवणारा दिग्दर्शक असा आनंददायी प्रवास झाला असला तरी मी अजून मध्यमवर्गीय मराठी माणूसच आहे. भूक लागल्यावर वडापावच खावासा वाटतो असे मधुर भांडारकर यांनी नमूद केले.

गेली अनेक वर्षे मी केवळ दीवाळी अंक वाचतच नाही तर संग्रही ठेवते. दीपोत्सवमध्ये असलेले लेख अत्यंत समृद्ध असून संग्रही ठेवावा असा हा अंक असल्याचे गौरवोद्गार फैय्याज यांनी काढले.

मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध आहे आणि अत्यंत सुशिक्षित अशा या समाजात दिवाळी अंक लाखाच्या घरात खपू शकतात आणि जिथे जिथे मराठी आहे तिथे तिथे लोकमतचा दीपोत्सव पोहोचू शकतो हे शक्य झालेलं आहे असे लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी सांगितले.

मराठी दिवाळी अंकाच्या शतकोत्तरी इतिहासात वेगळी उंची गाठणा-या लोकमत समूहाच्या "दीपोत्सव" या दिवाळी अंकाचे गुरुवारी १६ ऑक्टोबर रोजी मुंबईत मराठी नाट्यसंमेलनाच्या नियोजित अध्यक्षा फैय्याज यांच्याहस्ते प्रकाशन झाले. लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष व एडिटर इन चीफ खा. विजय दर्डा प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर दिग्दर्शक मधुर भांडारकर नेत्र शल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने वृत्तपत्रविक्री क्षेत्रातील व्यावसायिक बुवा दांगट या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला.