शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ समितीचा अहवाल स्वीकारला

By admin | Updated: June 25, 2015 02:10 IST

अन्न व औषधी प्रशासन विभागातील अनियमितता, गैरव्यवहार, भ्रष्टाचार यावर प्रकाश टाकणाऱ्या ‘राम भरोसे’ या मालिकेनंतर आघाडी सरकारने नेमलेल्या लोकमत चौकशी समितीचा

अतुल कुलकर्णी, मुंबई

अन्न व औषधी प्रशासन विभागातील अनियमितता, गैरव्यवहार, भ्रष्टाचार यावर प्रकाश टाकणाऱ्या ह्यराम भरोसेह्ण या मालिकेनंतर आघाडी सरकारने नेमलेल्या लोकमत चौकशी समितीचा अहवाल युती सरकारने स्वीकारला असून त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. लोकमतने ६ ते २० जानेवारी २०१३ असे १५ दिवस ह्यराम भरोसेह्ण नावाने एक मालिका प्रकाशित केली होती. त्यानंतर तत्कालीन मंत्री मनोहर नाईक यांनी तेव्हाचे आयुक्त महेश झगडे, दक्षता  विभागाचे प्रमुख एस.एच. काळे आणि अशासकीय सदस्य म्हणून अ‍ॅड. उदय बोपशेट्टी अशी तीघांची समिती नेमली होती. या समितीला ‘लोकमत चौकशी समिती’ असेच नाव देण्यात आले होते. तसा उल्लेखही अहवालात करण्यात आला आहे. समितीला दोन वेळा मुदतवाढ दिली गेली.

जेव्हा अहवाल आला त्यावेळी निवडणुकांचे कारण देत कारवाई करण्यास टाळाटाळ केली. मात्र, युती सरकारने झगडे समितीचा अहवाल स्वीकारला आहे. याबाबत मंत्री बापट म्हणाले, आपल्या सरकारने हा अहवाल पूर्णत: स्वीकारला असून या अनुषंगाने आपण आयुक्त हर्षदीप कांबळे आणि अन्य अधिकाºयांची बैठक देखील घेतली आहे. अहवालात दर महिन्याला बैठका घेण्याच्या सूचना केल्या आहेत. दर सहा महिन्यानी कार्यपूर्ती अहवाल शासनास लेखी कळवण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय ज्या ज्या गोष्टी अजूनही प्रलंबीत आहेत त्यांची यादी सादर करा, आणि त्यादृष्टीने काय केले जाणार आहे याचाही अहवाल देण्याचे सांगण्यात आले आहे. लोकमतने ज्या ज्या गोष्टी मालिकेत मांडल्या होत्या त्या सगळ्या खºया आहेत, अन्न व औषध प्रशासन विभागाने अनेक अक्षम्य चूका केल्या आहेत, दोषींवर कारवाया झालेल्या नाहीत असे अनेक निष्कर्ष मांडले आहेत.