शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ने दिलेला पुरस्कार सगळ्यात मोठा - आशा भोसले

By admin | Updated: April 4, 2016 03:24 IST

‘आतापर्यंत मला ‘महाराष्ट्र गौरव’ हा पुरस्कार दिला गेलेला नाही, पण आज ‘लोकमत’ने दिलेला पुरस्कार मला सगळ्या पुरस्कारांपेक्षा मोठा पुरस्कार वाटतो,’ अशी हृद्य भावना संगीत रसिकांच्या मनावर

मुंबई : ‘आतापर्यंत मला ‘महाराष्ट्र गौरव’ हा पुरस्कार दिला गेलेला नाही, पण आज ‘लोकमत’ने दिलेला पुरस्कार मला सगळ्या पुरस्कारांपेक्षा मोठा पुरस्कार वाटतो,’ अशी हृद्य भावना संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांनी व्यक्त केली. ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आशा भोसले यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानचिन्ह व पाच लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.या वेळी रसिकांशी संवाद साधताना आशाताई म्हणाल्या, ‘आता खूप वर्षे झाली. गेली ७२ वर्षे मी गात आहे. लोक माझी गाणी आजही तितक्याच प्रेमाने ऐकतात. माझ्यावर तेवढेच प्रेम करतात. ते अजून माझे शो बघतात, याचे समाधान काही वेगळेच आहे. हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मला मिळाला, याचाही आनंद आहे. अजून काय म्हणू? मी भाग्यवान आहे!’ ज्येष्ठ गायक शंकर महादेवन यांनी या वेळी आशा भोसले यांनी अजरामर केलेल्या गाण्यांचे मुखडे पेश करत, त्यांच्या कारकिर्दीला सलाम केला. क्लासिकल, जॅझ, भावगीत, नाट्यगीत, गझल, अभंग असे विविध प्रकार आशा भोसले यांच्या सुरातून उमटले आहेत. ‘भारतीय चित्रपट संगीताचा आत्मा काय, याची व्याख्या जर एका शब्दात करायची झाली, तर मी म्हणेन की, तो शब्द म्हणजे ‘आशा भोसले’ हाच आहे,’ असे गौरवोद्गार शंकर महादेवन यांनी या वेळी काढले.