शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ पुरस्काराने आमदारांचा गौरव!

By admin | Updated: August 5, 2016 06:59 IST

लोकमत विधिमंडळ पुरस्काराचा दिमाखदार सोहळा बुधवारी येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला

मुंबई : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अभ्यासू आमदारांना पुरस्कृत करणारा लोकमत विधिमंडळ पुरस्काराचा दिमाखदार सोहळा बुधवारी येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ^^‘लोकमत’चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या मुख्य उपस्थितीत आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, राज्याचे अनेक मंत्री, आमदार, विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या स्नेहमयी उपस्थितीत हा समारंभ साजरा झाला. आर.आर. पाटील फाउंडेशन प्रस्तुत लोकमत विधिमंडळ पुरस्काराने आम्हाला अधिक चांगले संसदीय कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, अशी भावना भरगच्च सभागृहाच्या साक्षीने विजेत्यांनी व्यक्त केली. लोकमतचे चेअरमन विजय दर्डा यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे स्वागत विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, आ. सुमनताई पाटील यांनी केले. समारंभाचे सूत्रसंचालन लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर यांनी तर आभार प्रदर्शन समूह संपादक दिनकर रायकर यांनी केले. (विशेष प्रतिनिधी) >जीवनगौरव अन् अभिवादनशेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ सदस्य आणि दहाव्यांदा विधानसभेचे सदस्य असलेले गणपतराव देशमुख आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते, विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांना या वेळी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राच्या राजकारणातील या दोन व्यक्ती पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर आल्या तेव्हा संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटाद्वारे त्यांना अभिवादन केले. संसदीय लोकशाहीचा प्रदीर्घ अनुभव असलेले शिवराज पाटील चाकूरकर हे गणपतराव देशमुख यांचा हातात हात घेऊन काही क्षण उभे होते तेव्हाही सभागृहातील वातावरण भारावून गेले. >पुरस्काराने जबाबदारीची जाणीव वाढेल : मुख्यमंत्रीप्रत्येक पुरस्काराने जबाबदारीची जाणीव वाढतच असते. त्यातच ‘लोकमत’सारख्या महत्त्वाच्या वृत्तपत्र समूहाने दिलेल्या पुरस्काराचे मोल कितीतरी अधिक आहे. मी इथे पुरस्कार देण्यासाठी आलो होतो; पण मला पुरस्कार देऊन सरप्राइज मिळाले, अशी आनंदाची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. लोकमतच्या लाखो वाचकांच्या पसंतीची मोहर या पुरस्कारावर उमटलेली होती.>पुरस्काराचे मानकरीजीवनगौरव : शिवाजीराव देशमुख (विधान परिषद), गणपतराव देशमुख (विधानसभा)लोकमत रिडर्स चॉईस पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउत्कृष्ट नवोदित आमदारअतुल भातखळकर (विधानसभा-भाजपा), राहुल नार्वेकर (राष्ट्रवादी). उत्कृष्ट महिला आमदार डॉ.नीलम गोऱ्हे (विधान परिषद- शिवसेना), वर्षा गायकवाड (विधानसभा-काँग्रेस)अभ्यासू वक्ता आमदार धनंजय मुंडे (विधान परिषद, राष्ट्रवादी), प्रकाश आबिटकर (विधानसभा-शिवसेना).