शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
4
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
5
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
6
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
7
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
8
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
9
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
10
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
11
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
12
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
13
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
14
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
15
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
16
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
17
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
18
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
19
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
20
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत

भरपावसात ‘लोकमत’वर बरसली ‘वाचकमाया’

By admin | Updated: May 15, 2015 23:31 IST

अलोट गर्दी : नवव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

सातारा : दिवसभर शहरावर पसरलेली आभाळमाया आणि सायंकाळी भरपावसात बरसलेली ‘वाचकमाया’ अशा भारावलेल्या वातावरणात ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचा नववा वर्धापनदिन मोठ्या थाटामाटात साजरा झाला. यानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यास उपस्थित अलोट गर्दीने सातारकरांचे ‘लोकमत’वरील प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित केले.विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्नेहमेळाव्याचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, बँकेचे संचालक अनिल देसाई, डॉ. सुयोग दांडेकर, डॉ. प्रताप गोळे, डॉ. जयश्री शिंदे, सिनर्जी ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे अमोल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते शशिकांत शिंदे, जिल्हा बँकेचे नूतन अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, (पान १० वर)आमदार जयकुमार गोरे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्नेहमेळाव्यास हजेरी लावली. ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विजय पोवार, आवृत्तीप्रमुख सचिन जवळकोटे, मनुष्यबळ आणि प्रशासन व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले‘राधिका पॅलेस’मध्ये सायंंकाळी सहा वाजता स्नेहमेळावा सुरू झाला, तेव्हापासूनच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे आगमन सुरू झाले होते. पाऊस सुरू झाला, तरी स्नेहमेळाव्यास येणाऱ्यांची संख्या वाढतच राहिली. राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, बँकिंग, सांस्कृतिक, पर्यावरण, आरोग्य, उद्योग-व्यवसाय, बांधकाम क्षेत्रांतील मान्यवर, लोकमतचे हितचिंतक, जाहिरातदार व वृत्तपत्र एजंटांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व ‘लोकमत’च्या वर्षभरातील कामगिरीबद्दल प्रशंसोद््गार काढले. (प्रतिनिधी)‘हेल्दी सातारा’ विशेषांकाचे प्रकाशनवर्धापनदिनानिमित्त ‘लोकमत’ने यावर्षी ‘हेल्दी सातारा’ या विषयावरील विशेषांक तयार केला आहे. या अंकाचे प्रकाशन सकाळी श्री खिंडीतील गणपती आणि कुरणेश्वर देवस्थान येथे करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’ परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. गतिमान जीवनशैलीत आरोग्य टिकविणे आणि जोपासणे दिवसेंदिवस कठीण झाले असून, या पार्श्वभूमीवर ‘हेल्दी सातारा’ विशेषांक मार्गदर्शक व संग्राह्य आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.