शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान

By admin | Updated: September 4, 2016 02:27 IST

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या सिंहगर्जनेची शताब्दी आणि ही सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांचे १६०वे जयंती वर्ष, त्याबरोबरच

- वर्षा फडके ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या सिंहगर्जनेची शताब्दी आणि ही सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांचे १६०वे जयंती वर्ष, त्याबरोबरच पुढील वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाला होणारे सव्वाशे वर्ष या निमित्ताने लोकमान्य टिळक यांची जीवनगाथा, कार्य नव्या पिढीसमोर पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ आणि लोकमान्य उत्सवाचे आयोजन केले आहे. या नव्या उपक्रमावर टाकलेला हा दृष्टिक्षेप....लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे यंदा १६० वे जयंती वर्ष साजरे होत आहे. त्याशिवाय ज्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, त्या सार्वजनिक गणेशोत्सवालादेखील पुढील वर्षी सव्वाशे वर्षे पूर्ण होत आहेत. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ ही सिंहगर्जना करून ब्रिटिश साम्राज्याला हादरा दिला आणि देशाला स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरित केले, त्या सिंहगर्जनेचेदेखील हे शताब्दी वर्ष आहे. या सगळ्या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून राज्य शासनाने लोकमान्य टिळकांची जीवनगाथा आणि कार्य जनतेपर्यंत विशेषत: युवा पिढीसमोर आणण्यासाठी ‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ आणि ‘लोकमान्य’ उत्सवाचे आयोजन केले आहे. लोकमान्य महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांतून सामाजिक एकोपा टिकवून, तो वृद्धिंगत करण्याचा उद्देश आहे. लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान हे यंदाच्या गणेशोत्सवात राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांचे विचार, त्यांची चतु:सूत्री, तसेच समाजामध्ये जनजागृती घडविणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धेचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले आहे. या स्पर्धेत भाग घेण्याकरिता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव, व्यसनमुक्ती आणि जलसंवर्धन यापैकी एका विषयावर देखावा तयार करावा लागणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची तपासणी व पारितोषिक निवडीची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी, तसेच देखाव्याची पाहणी करण्याकरिता तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर समिती नेमण्यात आली आहे. गणेशोत्सव साजरा करण्याची मंडळांची पद्धत, देखावे, सामाजिक कार्य, समाजाचा सहभाग आदींचे मूल्यांकन करून तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर होणार विजेत्या मंडळांचा गौरव करण्यात येणार असून, त्यांना रोख बक्षिसेही देण्यात येणार आहेत. प्रत्येक सहभागी गणेशमंडळांना शासनाकडून सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. या अभियानात सहभागी होण्याची मुदत ४ सप्टेंबर आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली असणे आवश्यक आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी झाल्याचे अर्ज आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे, तर मुंबई शहर आणि उपनगरातील मंडळांनी त्यांचे अर्ज उपसंचालक (शिक्षण), जवाहर बालभवन, नेताजी सुभाष मार्ग, चर्नीरोड, मुंबई या कार्यालयात सादर करावेत. गणेशोत्सव अभियानाची माहिती, अर्ज www.cultural.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. लोकमान्य उत्सव लोकमान्य टिळकांची जीवनगाथा, त्यांनी केलेल्या संघर्षाचा लढा विविध माध्यमांद्वारे नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकमान्य उत्सव’ आयोजित केला जाणार आहे. यााकरिता देश-विदेशातील महाराष्ट्र मंडळांचे पदाधिकारी आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ/महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. एकूणच लोकमान्य टिळकांचे कार्य गणेशोत्सव अभियान आणि लोकमान्य उत्सवाच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर मांडताना, स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव-बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, जलसंवर्धन आदी विषयांवरील सजावट-देखावे निश्चितच प्रबोधनात्मक ठरणार आहेत.

(लेखिका या माहिती जनसंपर्क महासंचालनालयात वरिष्ठ सहायक संचालिका आहेत.)