शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

Lok Sabha Election 2019 : राज्यातील हवा बदलतेय, विधानसभेला राज ठाकरेंशी चर्चा होऊ शकते - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 12:11 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला अनुकूल चित्र दिसत आहे. आपण अनेक निवडणूका पाहिल्या, यापुर्वी देशाचा पंतप्रधान महाराष्ट्रात एक-दोन वेळा प्रचारासाठी येत होते. आता नरेंद्र मोदी यांना दर दोन-तीन दिवसांनी महाराष्ट्रात यावे लागते.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीर हे संवेदनशील राज्य असल्याने कोणताही निर्णय संयमाने व लोकांचे हित पाहूनच घ्यावा लागतोआश्वासने नरेंद्र मोदी सरकारने न पाळल्याने जनतेमध्ये असंतोष

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला अनुकूल चित्र दिसत आहे. आपण अनेक निवडणुका पाहिल्या, यापुर्वी देशाचा पंतप्रधान महाराष्ट्रात एक-दोन वेळा प्रचारासाठी येत होते. आता नरेंद्र मोदी यांना दर दोन-तीन दिवसांनी महाराष्ट्रात यावे लागते, यावरून येथील राजकीय हवा बदलत असल्याचे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत केले.

शरद पवार म्हणाले, मागील निवडणूकीत दिलेली आश्वासने नरेंद्र मोदी सरकारने न पाळल्याने जनतेमध्ये असंतोष आहे. त्यामुळे रोज एक प्रचाराचे मुद्दे बाहेर काढत आहेत. व्यक्तीगत हल्ले करून त्यातून प्रतिसाद मिळत नसल्याने आता त्यांनी काश्मीरमध्ये काँग्रेस फुटीरवाद्यांसमवेत गेल्याची टीका करत आहेत. त्यांच्या टीकेचा रोक जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याकडे आहे, पण ते आमचे घटकपक्षच नाहीत.

उलट भाजपाच त्यांच्यासमवेत सरकारमध्ये होते. तीन-चार वर्षापुर्वी मोदी यांनी काश्मीरच्या विकासाचा चांगला कार्यक्रम मांडल्याने त्याचे स्वागत केले. पण त्यातील एकाही गोष्टीची अंमलबजावणी झाली नसल्याने येथील तरूण पिढी संतप्त आहे. जम्मू-काश्मीर हे संवेदनशील राज्य असल्याने कोणताही निर्णय संयमाने व लोकांचे हित पाहूनच घ्यावा लागतो. त्यामुळे नरेंद्र मोदी यांची टीका गांभीर्याने घेण्यासारखी नसते.

वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा काय माहिती नाही, त्यामुळे त्याचा फटका कोणला बसेल हे आताच सांगता येणार नाही. पण जाणीवपुर्वक मतविभागणी करण्यासाठी काही मंडळींनी केलेला हा कार्यक्रम असू शकतो. असेही पवार यांनी सांगितले.भीतीपोटीच पर्रीकरांनी संरक्षणमंत्री पद सोडले

‘राफेल’ विमान खरेदीमध्ये भाजपा सरकारने तीन दर सांगितले. या व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी धरली. यामध्ये नेमके काय गौडबंगाल झाले, याची कल्पना दिवगंत मनोहर पर्रीकरांना होती. त्यामुळेच देशाचे अतिशय महत्त्वाचे असलेले संरक्षण मंत्री पद सोडून ते गोव्यासारख्या राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचे पवार यांनी सांगितले.‘मोदी-शहा’ हटाव हाच ‘राज’ यांचा एककलमी कार्यक्रम

‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. नरेंद्र मोदी व अमित शहा हे देशाच्या हितादृष्टीने घातक असल्याचे सांगत त्यांना हटविण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी घेतला आहे. लोकसभेला ते आघाडीसोबत नाहीत, विधानसभेला त्यांच्याशी चर्चा होऊ शकते, असेही पवार यांनी सांगितले.‘ध्यानात काय ठेवले’ हे लवकरच कळेल

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ या टॅगलाईन खाली शिवसेनेचा प्रचार सुरू केला आहे. त्यावर पेठवडगावच्या सभेत ‘ त्यांचे ठरलंय तर आम्ही पण ध्यानात धरलंय’ असा सूचक इशारा पवार यांनी दिला होता. त्याबाबत पुन्हा विचारणा केली असता, ‘मी महाराष्ट्रभर फिरतो त्यामुळे कोण काय काय म्हणतो ते सगळे ध्यायात ठेवतो. त्यामुळे ध्यानात काय ठेवले हे तुम्हाला लवकरच कळेल. असे पवार यांनी सांगितले.जनतादल आमच्या सोबत

जनतदलाची आमची आघाडी असून या पक्षाचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा हे आमच्यासोबत सक्रीय आहेत. त्यामुळे कोल्हापूरात ते आमच्या सोबत राहतील, असे शरद पवार यांनी श्रीपतराव शिंदे यांच्या भूमिकेवर स्पष्ट केले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर