शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

Lok Sabha Election 2019 : विशाल पाटील यांच्याआडून ‘गेम’ कुणाचा..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 14:52 IST

सांगली लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आम्हांला पाठिंबा द्यावा अशी विनंती काँग्रेसचे नेते विशाल प्रकाश पाटील व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे आज शुक्रवारी सकाळी केली.

ठळक मुद्देविशाल पाटील यांच्याआडून ‘गेम’ कुणाचा..?सांगलीत भाजपअंतर्गत कुरघोडी : सकाळी घेतली शेट्टी यांची भेट

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : सांगली लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आम्हांला पाठिंबा द्यावा अशी विनंती काँग्रेसचे नेते विशाल प्रकाश पाटील व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे आज शुक्रवारी सकाळी केली.

खासदार शेट्टी, व या दोन भावांमध्ये त्यासाठी शेट्टी यांच्या शिरोळमधील निवासस्थांनी सुमारे दीड तास बंद खोलीत चर्चा झाली. परंतू शेट्टी यांनी त्यांना स्वाभिमानी संघटेच्या चिन्हांवरच आपण ही निवडणूक लढवावी, तुम्ही अपक्ष म्हणून लढणार असाल तर मला पाठिंबा देता येणार नाही असे स्पष्ट केले.

त्यामुळे त्यांनी आम्ही वसंतदादा गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय आज-उद्या कळवितो असे सांगितले आहे. विशाल यांना ‘अपक्ष’लढवून कुणाचा तरी राजकीय गेम करण्याच्या हालचाली आकारास येत असल्याचे चित्र आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये विशाल पाटील दुहेरी गेम खेळत असल्याचे चित्र पुढे आले आहे. सांगलीच्या राजकारणात भाजपचे खासदार संजय पाटील यांना पक्षाअंतर्गत विरोध आहे. तो विरोध कुणाचा आहे हे सगळ््या पश्चिम महाराष्ट्राला माहित आहे. त्याच लॉबीला संजय पाटील यांचा पराभव करायचा आहे. त्यासाठी विशाल पाटील यांना वाट्टेल ती मदत करायची या लॉबीची तयारी आहे.

संजय पाटील पराभूत व्हायला हवेत परंतू भाजपची तरी एक जागा कमी होता कामा नये असे या लॉबीचे प्रयत्न आहेत. त्यामुळे विशाल पाटील यांनी त्यासाठी अपक्ष निवडणूक लढवली पाहिजे अशीही जोडणी आहे. विशाल पाटील हे जर स्वाभिमानी संघटनेकडून लढले, तर त्यांना मदत करून निवडून आणण्यात या लॉबीला कांही रस नाही. कारण तसे झालेच तर एक जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातील वाढते.

स्वाभिमानी संघटनेकडून लढायचे झाल्यास पैसा कोण घालणार या सुध्दा विशाल पाटील यांच्यापुढे मोठा प्रश्र्न आहे. आर्थिक मदत करण्याची संघटनेला मर्यादा आहे. शेट्टी यांच्या प्रतिमेवर त्यांना जशी कोल्हापूरात  मदत मिळते तशी प्रस्थापित राजकारणी असल्याने विशाल पाटील यांना ती सांगलीतून मिळणार नाही. त्यामुळेही विशाल पाटील स्वाभिमानीचा झेंडा हातात घेवून मैदान उतरतात का याबध्दल साशंकताच जास्त आहे. काँग्रेसलाही विशाल पाटील हे आपल्याबरोबर दुहेरी गेम करत असल्याचे वाटते.

सांगलीची जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली आहे. त्याची माहिती गुरुवारीच खासदार शेट्टी यांनी येथे पत्रकारांना दिली होती. परंतू आमचा अजून उमेदवार ठरलेला नाही. त्याबाबतचा सस्पेंन्स दोन दिवसांत उघड करू असे शेट्टी यांनी सांगितले होते. व्यक्तिगत शेट्टी आणि प्रतिक पाटील यांच्यामध्ये अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. सांगलीची जागा काँग्रेसने आम्हांला दिली आहे, त्यासाठी आम्ही काय ताकद पणाला लावली नव्हती.

आम्ही तीन जागा काँग्रेसल्या सुचविल्या होत्या असे शेट्टी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वसंतदादा घराण्याचाही सन्मान व्हावा व संघटनेकडेही ही जागा राहावी यासाठी सांगलीतून स्वाभिमानीकडून विशाल पाटील यांनीच निवडणूक लढवावी असा प्रस्ताव दिला आहे. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पातळीवरही सुरु आहेत.

संघटनेकडून वैभव नायकवडी, अरुण लाड किंवा गोपीचंद पडळकर या तिघांशी संपर्क साधण्यात आला आहे. विशाल पाटील हे तयार नाही झाले तर यांच्यापैकी कोणतरी एकजण उमेदवार होवू शकतात. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsangli-pcसांगलीhatkanangle-pcहातकणंगलेkolhapur-pcकोल्हापूर