शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्लोबलायझेशनमध्ये लोकलायझेशन जपावे’

By admin | Updated: October 31, 2016 02:15 IST

हल्ली जग वेगाने बदलत आहे. या ग्लोबलायझेशनच्या युगात लोकलायझेशन जपणे आता महत्त्वाचे झाले आहे

मुंबई: हल्ली जग वेगाने बदलत आहे. या ग्लोबलायझेशनच्या युगात लोकलायझेशन जपणे आता महत्त्वाचे झाले आहे. विलेपार्ल्याने देखील हे लोकलायझेशन जपल्याचे मत लेखक आणि विचारवंत अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले; किंबहुना हेच पार्लेकरांचे वैशिष्ट्य असल्याचे ही दिसून येत असल्याचे गोडबोले यांनी सांगितले.विलेपार्ले पश्चिमेकडील लोकमान्य सेवा संघ येथील पु.ल. देशपांडे सभागृहात आयोजित ‘आम्ही पार्लेकर’च्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून गोडबोले बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांची उपस्थिती होती. ‘आम्ही पार्लेकर’चे ज्ञानेश चांदेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षीय भाषणात गोडबोले म्हणाले की, आगामी युग हे तंत्रज्ञानाच्या एकत्रिकरणाचे आहे. त्यामुळे भविष्याची चाहूल घेत त्यादृष्टीने हालचाली करण्याची गरज आहे. ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर म्हणाले की, पार्लेकरांचे आयुष्य समृद्ध करणारा हा स्तुत्य उपक्रम आहे. पार्ल्यात काय घडत आहे, या सोबत पार्ल्यात काय घडायला हवे याचा विचार करत पार्ल्याचे पालकत्व घेतल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)लोकचळवळींचा सन्मानया कार्यक्रमात स्थानिक पातळींवर काम करणाऱ्या लोकचळवळींचा सन्मान झाला. यात २८ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या जनसेवा समिती, ज्येष्ठ व गरजूंसाठी काम करणारे मराठी मित्र मंडळ, स्वच्छता उपक्रम राबवणारे स्वच्छ पार्ले अभियान, सुंदर पार्ले हरित पार्ले संकल्पना राबविणारे वृक्षमित्र व स्थानक परिसर स्वच्छ करणाऱ्या आय अ‍ॅक्ट या लोकचळवळींचा गौरव करण्यात आला.