शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चर्चगेट स्थानकात लोकल प्लॅटफॉर्मला धडकून ५ जखमी

By admin | Updated: June 28, 2015 18:05 IST

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर एक लोकल धडकून झालेल्या अपघातात मोटरमनसह पाच जण जखमी झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर एक लोकल धडकून  झालेल्या अपघातात मोटरमनसह पाच जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. जखमींमध्ये २ पुरूष व ३ महिलांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. प्लॅटफॉर्मला धडकल्याने लोकलचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. चर्चगेट स्थानकाहून विरारच्या दिशेने जाणा-या दोन्ही मार्गावरील ( धिमी व जलद) लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. सुदैवाने आज रविवार असल्याने गाडीत व प्लॅटफॉर्मवर जास्त गर्दी नव्हती व त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले  असून डबा हटवण्याचे काम सुरू आहे. या अपघाता प्रकरणी मोटरमन एल.एफ. तिवारी व गार्ड अजय गोहिल यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान आज झालेला हा अपघात ही पूर्णपणे मानवी चूक असून लोकलचा ब्रेक फेल झाल्याची शक्यता नाही असे पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर सुनीलकुमार सूद यांनी म्हटले आहे.