शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी

By admin | Updated: June 19, 2017 02:41 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ केवळ गरजू शेतकऱ्यांनाच मिळणार असून, त्यासाठी डिजिटल साधनांची मदत घेतली जाईल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ केवळ गरजू शेतकऱ्यांनाच मिळणार असून, त्यासाठी डिजिटल साधनांची मदत घेतली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. २००८ साली केंद्रातील यूपीए सरकारने दिलेल्या कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याने, अनेक गरजू शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले होते. ही बाब लक्षात घेऊन, आम्ही सावधानता बाळगत असल्याचे ते म्हणाले.कर्जमाफीचे निकष ठरविण्यासाठी राज्य शासनाने एक संयुक्त समिती स्थापन केली असून, कुणाकुणाला कर्जमाफीचा लाभ द्यायचा, याचा निर्णय येत्या आठवड्याभरात घेण्यात येईल. आर्थिक सुस्थितीत असणारे, व्यावसायिक किंवा शासकीय कर्मचारी असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर ११ जून रोजी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. या कर्जमाफीसाठी शासनाला तब्बल २५ हजार कोटी रुपये उभे करावे लागणार आहेत. आधीच कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या राज्यावर या निर्णयामुळे आणखी भार पडणार आहे. मात्र, ‘हा निधी उभा केला जाऊ शकेल,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. भाजपाच्या ‘सुशासन’ विभागातर्फे नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्यामुळे, राज्यातील शेतकऱ्यांनीही कर्जमाफीची मागणी उचलून धरली. परिणामत: त्यांनाही कर्जमाफी द्यावी लागली. मात्र, या निर्णयामुळे कोणत्याही क्षेत्रात भाववाढीची शक्यता नाही. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी डिजिटल साधनांचा वापर करून, कर्जमाफीमध्ये बनावट बँक खात्यांना वगळले, त्याबाबत फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले. आम्हीही हे मॉडेल अंगीकारण्याचा विचार करीत आहोत. या महिन्यातील कॅबिनेटच्या बैठकीत त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.कर्जमाफी हे शेतकऱ्यांच्या समस्येवरील प्रभावी उत्तर नाही. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक आणण्याचे आव्हान शासनापुढे आहे. शासन एक लाख शेततळी बांधत आहे, अधिकाधिक विहिरी खोदत आहे आणि ठिबक सिंचनासाठीही प्रयत्न करीत आहे. शासनाने तब्बल २५ हजार कोटींची गुंतवणूक शेतीत केली आहे. कर्जमाफीमुळे बाधा येऊ न देता, ही कामे सातत्याने सुरू ठेवण्याचे मोठे आव्हान आहे, असे फडणवीस म्हणाले.