शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळावी

By admin | Updated: June 16, 2017 00:55 IST

कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने करावी लागणार आहे. गरजू शेतकरी कर्जमाफीतून सुटणार नाही आणि एकही चुकीची व्यक्ती कर्जमाफीत येणार

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने करावी लागणार आहे. गरजू शेतकरी कर्जमाफीतून सुटणार नाही आणि एकही चुकीची व्यक्ती कर्जमाफीत येणार नाही, अशी यंत्रणा तयार करावी लागेल. त्यासाठी सर्व जिल्हाधिकारी व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले.महसूल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, मागील कर्जमाफीसंबंधीचा ‘कॅग’चा अहवाल डोळ्यांत अंजन घालणारा आहे. गतवेळी काही व्यक्तींनी ८० लाखांपर्यंत रक्कम माफ करून घेतली तर काहींनी शेतकरी नसताना कर्ज माफ करून घेतल्याचे दिसून येत आहे.मागील चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली समिती कर्जमाफीचे निकष ठरवणार आहे. विविध राजकीय पक्ष व शेतकरी नेत्यांशी चर्चा करून हे निकष निश्चित करावे लागणार आहेत. निकष निश्चित झाल्यानंतर त्या निकषाच्या अनुरूप आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात फार मोठी कसरत करावी लागणार आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.‘लोकाभिमुख व्हा’प्रशासनाकडून कसे काम केले जाते त्यावर राज्य शासनाचे मूल्यांकन केले जाते. त्यामुळे महसूल विभागाने पारदर्शकता वाढवत गतिशील आणि लोकाभिमुख होण्याची गरज आहे. तसेच आपण शासक नसून जनतेचे सेवक आहोत, या भूमिकेतून सर्व जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी सकारात्मकपणे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.अर्धन्यायिक प्रकरणे निकाली न काढल्यास कारवाईकायद्यानुसार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अर्धन्यायिक प्रकरणे दाखल झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधीत निकाली काढण्याचे बंधन आहे. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत या प्रकरणांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाऊ शकते. त्यामुळे एक वर्षाची मुदत संपून गेलेली प्रकरणे आॅक्टोबर २०१७पर्यंत निकाली काढावीत, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे महसूल परिषदेत स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, महसूल विभागाकडील कामाचा ताण लक्षात घेता अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी नमूद केले.