शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
3
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
4
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
5
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
6
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
7
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
8
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
9
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
10
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
11
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
12
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
13
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
14
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
15
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

साखर कारखान्यांना कर्ज; बँकांची नकारघंटा

By admin | Updated: August 11, 2015 01:14 IST

ऊस उत्पादकांची ‘एफआरपी’ची रक्कम देण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेले कर्ज देण्यास राष्ट्रीयीकृत बँकांनी नकार दर्शवला आहे. परिणामी, उसाची थकीत बिले मिळण्यास अडचणी आल्या असून,

- विश्वास पाटील,  कोल्हापूरऊस उत्पादकांची ‘एफआरपी’ची रक्कम देण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेले कर्ज देण्यास राष्ट्रीयीकृत बँकांनी नकार दर्शवला आहे. परिणामी, उसाची थकीत बिले मिळण्यास अडचणी आल्या असून, शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.राज्यातील लाखो शेतकऱ्यांची वाजवी व किफायतशीर मूल्याची (एफआरपी) रक्कम देण्यासाठी केंद्र शासनाने १,९८३ कोटी रुपयांचे कर्ज जाहीर केले आहे. त्याचे एक वर्षाचे व्याज केंद्र शासन व चार वर्षांचे व्याज राज्य सरकार देणार आहे. परंतु मुख्यत: राष्ट्रीयीकृत बँकांचा राज्य शासनाच्या हमीवर विश्वास नसल्याने त्या कर्ज द्यायला तयार नाहीत. शनिवारी त्यासंदर्भात साखर आयुक्त विपीन शर्मा यांनी पुण्यात निवडक कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यातील अडचणी समजून घेतल्या. २०१४-१५मध्ये १७८ कारखान्यांनी ९२९.५४ लाख टन उसाचे गाळप करून ११.२८च्या सरासरी उताऱ्याने १०४.८३ लाख टन साखर उत्पादन केले. मात्र, या हंगामात बाजारातील साखरेचे दर कोसळल्याने कारखान्यांपुढे आर्थिक संकट निर्माण झाले. त्यामुळे त्यांना ‘एफआरपी’ देता आली नाही. ही रक्कम देण्यासाठी केंद्र शासनाने २३ जून २०१५ला सॉफ्ट लोन जाहीर केले. त्यानुसार १४७ कारखान्यांनी २०१३-१४मध्ये उत्पादित केलेल्या पांढऱ्या साखरेच्या ११ टक्के साठ्यावर प्रतिटन २४ हजार रुपयांप्रमाणे बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला. तसा आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ३० जुलैला काढला. परंतु, राष्ट्रीयीकृत बँका राज्य शासनाच्या हमीवर विश्वास ठेवायला तयार नाहीत.साखर कारखानदारीच्या कर्जाची जोखीम १५० टक्क्यांवर गेली असल्याने कारखान्यांनी एक वर्षातच कर्ज परतफेड केल्यास ते देऊ, असे बँकांचे म्हणणे आहे. संचालक मंडळाने व्यक्तिगत थकहमी दिल्याशिवाय कर्ज देणार नाही, अशीही बँक व्यवस्थापनाची भूमिका आहे. केंद्राच्या कर्ज योजनेतून राज्याला १,९८३ कोटी रुपये मिळतील, मात्र अनेक कारखान्यांना कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करता येणार नसल्याने प्रत्यक्षात १४०० कोटीच उपलब्ध होतील, असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे किमान २,८०० कोटी रुपयांची एफआरपीची थकीत रक्कम देणे अशक्य होईल.