शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख कोटींची कर्जप्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: March 12, 2016 04:34 IST

नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून उद्योगपती विजय माल्ल्या फरार झाल्यानंतर आता थकीत कर्जाच्या प्रकरणांची चर्चा पुन्हा एकदा उजेडात आली असून देशातील ३३ ऋणवसुली न्यायाधिकरणात

मनोज गडनीस,  मुंबईनऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून उद्योगपती विजय माल्ल्या फरार झाल्यानंतर आता थकीत कर्जाच्या प्रकरणांची चर्चा पुन्हा एकदा उजेडात आली असून देशातील ३३ ऋणवसुली न्यायाधिकरणात तब्बल चार लाख कोटी रुपयांच्या याचिका निवाड्याच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले आहे. बँकांकडून घेतलेले कोणतेही कर्ज जर थकले, तर सर्वप्रथम बँकांच्या पातळीवर तीन वेळा नोटीस काढली जाते व संबंधित कर्जदाराला थकलेली रक्कम भरण्यास कालावधी दिला जातो; परंतु त्याही कालावधीत जर संबंधित कर्जदाराने थकलेल्या कर्जाचा भरणा केला नाही, तर बँकेतर्फे ऋणवसुली न्यायाधिकरणात दावा दाखल केला जातो. ऋणवसुली न्यायाधिकरणात निकाली निघालेल्या याचिकेसंदर्भात निवाडा मान्य नसल्यास थेट उच्च न्यायालय व तिथेही निवाडा मंजूर नसेल तर संबंधित दावेदार अथवा कर्जदाराला सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. मात्र, निवाड्याच्या पहिल्याच पायरीवर एवढी प्रकरणे अडकल्याने त्याची गती वाढविण्याची मागणी आता जोर धरत आहे. उपलब्ध माहितीनुसार, देशात ५०० कोटी रुपये किंवा त्यावरील मूल्याच्या थकीत कर्जाची प्रकरणे ही गुजरातमधील आहेत. गुजरात राज्यात दोन ऋणवसुली न्यायाधिकरणे असून तेथे दाखल एकूण दाव्यांपैकी ९० टक्के दावे हे ५०० कोटी रुपये किंवा त्यावरील आहेत, तर कर्जवसुलीचे सर्वाधिक दावे ही पश्चिम बंगालमध्ये दाखल व प्रलंबित असून त्यांची संख्या १६ हजार इतकी आहे. पश्चिम बंगालमध्ये तीन ऋणवसुली न्यायाधिकरण आहेत. देशात ३३ ऋणवसुली न्यायाधिकरणे असून यामध्ये तब्बल एक लाखाच्या आसपास याचिका न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. या सुमारे एक लाख याचिकांचे एकत्रित मूल्य चार लाख कोटी रु. आहे.