शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्जमाफी एक लाखापर्यंत

By admin | Updated: June 20, 2017 03:02 IST

कर्जमाफीसाठी शेतजमिनीची अट न ठेवता, एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करणार, एक ते दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या परतफेडीत काही वाटा शासन उचलणार

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कर्जमाफीसाठी शेतजमिनीची अट न ठेवता, एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करणार, एक ते दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या परतफेडीत काही वाटा शासन उचलणार आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना आणणार, अशी घोषणा आज राज्य शासनाने उच्चाधिकार व सुकाणू समितीच्या संयुक्त बैठकीत केली.शासनाने जाहीर केलेल्या एक लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा आम्हाला मान्य नाही. सरसकट कर्जमाफीच हवी, या मागणीवर ठाम असल्याचे सांगत, सुकाणू समितीचे सदस्य बैठकीबाहेर पडले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या बैठकीला सरकारच्या वतीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख सहभागी झाले, तर शेतकऱ्यांच्या वतीने खा.राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बच्चू कडू, अजित नवले, रघुनाथदादा पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते. ३१ मार्च २०१६ पर्यंतचे १ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ केले जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र, सुकाणू समितीने २०१७ मधील कर्जही माफ करण्याची मागणी केली आहे. एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले तर कर्जाची थकबाकी असलेले राज्यातील ८० टक्के शेतकरी पूर्णत: कर्जमुक्त होतात. एक ते २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जात शासनाने वाटा उचलला तर एकूण ८८ टक्के शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. या शिवाय नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठीही प्रोत्साहन देण्याची भूमिका शासनाने घेतलेली असल्याने हा मोठा दिलासा असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत सांगितले.राज्यातील शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज काही निकषांवर माफ करण्यात येईल, ही आजच्या बैठकीत शासनाने मांडलेली भूमिका आम्हाला मान्य नाही. सरसकट कर्जमाफीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असे आ.जयंत पाटील आणि आ.बच्चू कडू यांनी रात्री लोकमतला सांगितले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या वसंतराव नाईक मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शासनाच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. या निर्णयाने विदर्भ आणि मराठवाड्यातील ८५ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, असे ते म्हणाले. जीआर बदलण्याचीसरकारची तयारी१० हजार रुपयांच्या तत्काळ कर्जासाठीच्या जीआरमध्ये काही बदल करण्याची शासनाने तयारी दर्शविली असल्याचे आ.बच्चू कडू यांनी सांगितले. शासकीय अधिकारी असलेल्या शेतकऱ्यांना हे कर्ज मिळणार नाही, पण पाच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या व कर्मचारी असलेल्या शेतकऱ्यांना ते दिले जाईल, पंचायत समिती सदस्य, माजी सैनिकांनाही ते दिले जाईल, असे आश्वासन आजच्या बैठकीत देण्यात आल्याचे ते म्हणाले.‘त्या’ जीआरची केली होळीशासनाने शेतकऱ्यांना १० हजार रुपयांचे कर्ज तत्काळ देण्यासाठी जो जीआर काढला आहे, त्याची सुकाणू समितीच्या सदस्यांनी बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृहाबाहेर होळी केली. हा जीआर रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. या जीआरमधील अनेक अटी जाचक असून, त्यामुळे फार कमी लोकांना हे कर्ज मिळू शकेल, असे त्यांचे म्हणणे होते.