शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकहून पुण्यात आणले यकृत

By admin | Updated: June 27, 2016 22:05 IST

नाशिकमधील एका ब्रेनडेड घोषित केलेल्या रुग्णाचे यकृत पुण्याला साडेतीन तासांत आणण्यात आले आहे. या मार्गावर ग्रीन कॉरिडोर करुन २०८ किलोमीटरचे हे अंतर अवघ्या साडेतीन

- २०८ किमीचे अंतर साडेतीन तासात

मुंबई: नाशिकमधील एका ब्रेनडेड घोषित केलेल्या रुग्णाचे यकृत पुण्याला साडेतीन तासांत आणण्यात आले आहे. या मार्गावर ग्रीन कॉरिडोर करुन २०८ किलोमीटरचे हे अंतर अवघ्या साडेतीन तासांत कापणे शक्य झाले. नाशिकमधील सह्याद्री रुग्णालयात ६७ वर्षीय रुग्णाला २५ जून रोजी दाखल करण्यात आले होते. या रुग्णाला अंत:रक्तस्त्राव होत असल्याने तो उपचारांना प्रतिसाद देत नव्हता. २६ जूनला या रुग्णाला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. २७ जूनला पुण्याच्या ५० वर्षीय रुग्णासाठी अवघ्या साडेतीन तासात यकृत पुण्याच्या रुग्णालयात आणले गेले. गेल्या मे महिन्यांत नाशिकहून यकृत पुण्यात आणले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी औरंगाबादहून पुण्यात यकृत आणले होते. आणि तिसऱ्यांदा २७ जून रोजी नाशिकहून पुण्याला यकृत आणण्यात आले आहे. नाशिक ते पुणे हे अंतर २०८ किमी इतके आहे. हे अंतर कापण्यास सुमारे सहा तासांचा वेळ लागतो. ग्रीन कॉरिडोरमुळे हे अंतर फक्त साडेतीन तासात कापले गेले.नाशिकहून दुपारी ४ वाजता यकृत घेऊन डॉक्टरांचा चमू निघाला. सायंकाळी ७.३० वाजता पुण्याच्या डेक्कन रुग्णालयात यकृत पोहोचवण्यात आले. तत्काळ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरु करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरु होती. पुण्याच्या ५० वर्षीय पुरुषास यामुळे जीवनदान मिळाले आहे. (प्रतिनिधी)