शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे मोबाइल अ‍ॅप वापरणारे कमीच

By admin | Updated: February 3, 2017 01:03 IST

रेल्वेच्या मोबाइल तिकीट सुविधेला मिळत असलेल्या कमी प्रतिसादामुळे या सेवेत काही बदल करत आणखी काही सुविधा क्रिस (सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन) संस्थेकडून उपलब्ध

मुंबई : रेल्वेच्या मोबाइल तिकीट सुविधेला मिळत असलेल्या कमी प्रतिसादामुळे या सेवेत काही बदल करत आणखी काही सुविधा क्रिस (सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन) संस्थेकडून उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दोन व्हर्चुअल वॉलेट्सचा पर्याय देतानाच मोबाइल तिकीट सेवेत छापील प्रतीचा पर्यायही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रतिसाद वाढेल अशी आशा रेल्वेकडून व्यक्त केली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेचे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करणारे दहा लाख असून प्रत्यक्षात वापरणारे जवळपास चार हजार असल्याचे निदर्शनास आले आहे. तिकीट खिडक्यांवर तिकीट मिळवण्यासाठी तासन्तास प्रवाशांना उभे राहावे लागत असल्याने रेल्वेकडून तिकिटांसाठी अनेक पर्याय उपलब्ध केले जात आहेत. त्यातच मोबाइल तिकीट सेवा सुरू करताना २0१५ मध्ये यूटीएस आॅन मोबाइल हे अ‍ॅप रेल्वेच्या क्रिसकडून उपलब्ध करण्यात आले. पेपरलेस तिकीट सुविधा असणाऱ्या या सेवेत जीपीएस प्रणालीत तांत्रिक अडथळे येत असल्याने तिकीट काढताना प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असे. हा अडथळा दूर करत आता २५ जानेवारीपासून छापील प्रतीची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील आणि क्रिसचे मुंबईतील महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी दिली. या निर्णयानंतर क्रिसने आर वॉलेटसह प्रवाशांना आणखी दोन व्हर्चुअल वॉलेट्सचाही पर्याय दिला असल्याचे सांगितले. नोव्हेंबरमध्ये नोटाबंदीनंतर या अ‍ॅपला मिळणाऱ्या प्रतिसादात थोडी वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)दररोज ४५०० तिकिटे- ७ नोव्हेंबरअगोदर अ‍ॅपद्वारे अडीच ते तीन हजार तिकिटे काढली जात होती. आता यात वाढ होऊन ४,५00 तिकिटे काढली जातात.