शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

निराधार ‘मालन’ला थोडगेंचा पितृत्वाचा आधार

By admin | Updated: June 26, 2015 01:09 IST

मालन-सुनील यांचा आज विवाह : शाहू जयंतीच्या मुहूर्तावर समतेचा संदेश

कोल्हापूर : मालन नावाची लहान मुलगी आधार मिळावा म्हणून २००८ साली चालत किरवे (ता. गगनबावडा) येथे आली. काही दिवस गगनबावड्यात राहिल्यानंतर या मुलीला लोकांनी माजी पंचायत समिती सभापती बंकट थोडगे यांच्या घरी आणून सोडले. त्यानंतर थोडगे यांनी तिचा पाचवी मुलगी म्हणून सांभाळ केला. मालनचा आज, शुक्रवारी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदू पद्धतीने निवडे (ता. गगनबावडा) येथील सुनील आनंदराव खाडे यांच्याशी विवाह होणार आहे. वडणगे (ता. करवीर) येथील गरीब कुटुंबातील मालन ही निराधार मुलगी किरवे (ता. गगनबावडा) येथे चालत आली होती. तेथे लोकांनी तिची विचारपूस करून तिला काही दिवस तेथेच ठेवून घेतले. पुढे काही दिवसांनी तिला तेथील लोकांनी तत्कालीन पंचायत समिती सभापती बंकट थोडगे यांच्या घरी आणून सोडले. थोडगे यांनी तिला गगनबावडा येथील केंद्रीय शाळा कस्तुरबा गांधी विद्यालय येथे चौथीच्या वर्गात दाखल केले. दिवाळीच्या सुटीत सर्व मुली आपापल्या घरी गेल्या. मात्र, मालनचे कोणी नसल्याने ती शाळेच्या वसतिगृहातच राहिली. ही बाब मुख्याध्यापिकांनी थोडगे यांच्या कानांवर घातली. क्षणाचाही विचार न करता थोडगे यांनी तिचा आपल्या तमन्ना, उबेद, सिमरन, जब्बीन अशा चार अपत्यांबरोबरच पाचवं अपत्य म्हणून सांभाळ केला. मालननेही सर्वांबरोबर राहतच कमी कालावधीत त्यांना आपलेसे केले. बघता-बघता मालन विवाहयोग्य झाली. निवडे (ता. गगनबावडा) येथील कै. आनंदराव खाडे यांचे द्वितीय पुत्र सुनील यांच्याशी मालनचा विवाह निश्चित झाला. विशेष म्हणजे सामाजिक समतेचा संदेश देणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज, शुक्रवारी सायंकाळी चार वाजता दत्त मंदिर कार्यालय, निवडे येथे हा विवाह होणार आहे. यावेळी मुस्लिम समाज कन्यादान करणार आहे; तर ही कन्या हिंदू धर्मामध्ये वैवाहिक जीवन व्यतित करणार आहे. व्यासपीठावरील व्यक्तीच केवळ अक्षता टाकणार असून बाकीचे उपस्थित फुलांच्या पाकळ्या टाकणार आहेत. अक्षतांच्या रूपाने वाया जाणारे धान्य गरीब कुटुंबाला दिले जाणार आहे. लग्न सोहळ््यासाठी हे राबताहेतया समतेचे प्रतीक असणाऱ्या विवाहाचे आयोजन शिव-शाहू-फुले-आंबेडकर-अण्णा भाऊ साठे विचारमंच, सुन्नत जमात, तिसंगीवाडी, फकीरवाडी, निवडेवाडी व मस्जिदवार जमात, बंकट थोडगे परिवार, शाहीर आझाद लोककला सांस्कृतिक मंच, कोल्हापूर, स्वामी समर्थ केबल नेटवर्क, अभिमन्यू गु्रप (निवडे), न्यू आझाद तरुण मंडळ, तिसंगी व गावातील सर्व तरुण मंडळी या सोहळ्यास कुटुंबीयांसह उपस्थित राहणार आहेत.