शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

थोडी सावधगिरी.. थोडी दक्षता!

By admin | Updated: July 13, 2014 01:22 IST

गर्दीचे ठिकाण.. मंदिरे, मशिदी अन् धावत्या बसगाडय़ा.. रेल्वे, बसस्थानके ही ठिकाणं हमखास दहशतवाद्यांच्या रडारवर असतात.

रेवणसिद्ध जवळेकर - सोलापूर
गर्दीचे ठिकाण.. मंदिरे, मशिदी अन् धावत्या बसगाडय़ा.. रेल्वे, बसस्थानके ही ठिकाणं हमखास दहशतवाद्यांच्या रडारवर असतात. हाच धागा पकडून सोलापूर पोलीस आयुक्तालयाने काढलेली डॉक्युमेंटरी फिल्म आता अशा ठिकाणांसह शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहे, प्रसारमाध्यमांतून दाखवली जाणार आहेत. जागरूक नागरिकच दहशतवादी कारवाया कशा रोखू शकतील, हे दाखवण्यासाठी स्थानिक कलाकारांची मदत घेण्यात आली आहे. 
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर दहशतवादी हल्ल्याची भीती याआधीच गुप्तचर संघटनेने दिली आहे. अतिरेकी हे कोणत्या रूपात डाव साधतील, याचा नेम नाही. यासाठी सा:यांनाच दक्ष राहणो सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे.  दहशतवादी कृत्ये कशी रोखता येतील, याविषयी शहरवासीयांना जागरूकतेचे, सावधानतेचे धडे देण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालयाने ‘थोडी सावधगिरी.. थोडी दक्षता.. थोडी खबरदारी..’  यावर खास डॉक्युमेंटरी फिल्म तयार केली आहे.
ही फिल्म स्थानिक चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना पाहावयास मिळणार आहे. आर्यन क्रिएशनने निर्मिती केली असून विनायक होटकर यांनी स्क्रिप्ट लेखन तर सचिन जगताप यांनी दिग्दर्शन केले आहे. संजय शिंदे, राहुल चवरे, शैलेश वाडकर, खाजप्पा सूर्यवंशी, रोहिणी गोरे, रत्नमाला ससाणो, राहुल स्वामी, सचिन रोहिले, सुभाष सुरवदे आणि अन्य कलावंतांना घेऊन आयुक्तालयाने बनवलेली  डॉक्युमेंटरी फिल्म पाहिल्यानंतर प्रत्येक जण सतर्क होईल.
जाऊ द्या आपल्याला काय देणो-घेणो
जो-तो आपण भलं, आपलं घर भलं, असा विचार करतो. यामुळेच दहशतवाद्यांचे फावत आहे. हाच धागा पकडून पोलीस आयुक्तालयाने अतिरेकी येतात कसे, डाव साधून निघून जातात कसे? या दोन प्रश्नांची उत्तरे चित्रपटगृह, मंदिर, मशीद, बसस्थानक, गर्दीचे ठिकाण, रेल्वे स्थानकावरील चित्रीकरणांमधून मिळतात. ‘जाऊ द्या, आपल्याला काय देणो-घेणो’ ही मानसिकता नष्ट करण्याचा प्रयत्न पोलीस आयुक्तालयाने केला आहे.
झोपी गेलेल्यांना जागवण्याचा प्रयत्न
संगणक, इंटरनेटच्या युगात प्रत्येक जण आपल्या कामात मगA आहे. देशात, शहरात, आपल्या घरात काय चाललंय, याची पुसटशीही कल्पना त्यांना नसते. निद्रिस्त अन् डोळ्यांवर झापड लावलेल्या लोकांमुळे दहशतवादी कृत्यांना सहजपणो आमंत्रण मिळते. 
झोपी गेलेल्यांना जागे करणो आणि ‘व्हॉट्सअॅप’मध्ये डोके घालणा:यांना बाहेर काढल्याशिवाय दहशतवादी कृत्यांचा सामना 
करता येणार नसल्याचा स्पष्ट 
संदेशही विविध चित्रीकरणांमधून दिसत आहे.
 
शांततेसाठी, एकात्मतेसाठी लाखमोलाची योजना
आयुक्तालयाने तयार केलेली डॉक्युमेंटरी फिल्म शहराच्या शांततेसाठी, एकात्मतेसाठी लाखमोलाची आहे. प्रत्येक नागरिक सतर्क राहिला तर पोलिसांनाही सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करता येईल. राज्य पातळीवरील विविध चॅनल्सवरही ही फिल्म दाखवण्याचा विचार आहे. - प्रदीप रासकर, पोलीस आयुक्त, सोलापूर
 
फिल्म तयार करताना अशी स्थळे निवडण्यात आली आहेत की, ज्या ठिकाणी अतिरेकी नेमके लक्ष ठेवून असतात. राज्यात इतर ठिकाणीही पोलिसांनी असा प्रयोग करण्यास हरकत नाही. - सचिन जगताप, दिग्दर्शक-संकलक
 
च्मोठमोठय़ा अपार्टमेंटलाही लक्ष्य केले जात असल्याचा एक प्रसंग चित्रीकरणातून दाखविला आहे. एक संशयित इसम अपार्टमेंटमध्ये घुसतो. सुरक्षारक्षक त्याला अडवतो. ‘त्या’ इसमाला डाव तर साधायचा असतो. अखेर खिशातील एक नोट त्याच्याकडे सरकावतो अन् तो रक्षकही त्याला बिनधास्तपणो आत जाण्याची परवानगी देतो.
 
च्हातात आणलेला एक गिफ्टचा बॉक्स ‘तो’ पार्किगच्या ठिकाणी थांबलेल्या कारच्या खाली सरकवतो आणि परततो. त्याच वेळी एक महिला त्याला पाहते. हा कोणीतरी संशयित आहे, असे पुटपुटतच पुढे निघून जाते. काही क्षणांतच बॉम्बस्फोट होतो. या दृश्याच्या नेमके चित्र पॉङिाटिव्ह असे दाखवले गेले. त्यात ती महिला ओरडत-ओरडत ‘अरे, पकडा त्याला’ असा आवाज येताच आजूबाजूचे लोक त्याला पकडतात.