शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी!

By admin | Updated: June 25, 2017 02:49 IST

राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, ही कर्जमाफी ३४ हजार २२ कोटी रुपयांची असेल.

विशेष प्रतिनिधी लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, ही कर्जमाफी ३४ हजार २२ कोटी रुपयांची असेल. हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने शनिवारी घेतला असून, त्यामुळे ४४ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. देशात आजवर कुठल्याही राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीपेक्षा ही रक्कम अधिक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या योजनेला छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना असे नाव देण्यात आले आहे.या निर्णयामुळे दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेले ३६ लाख शेतकरी आणि त्यापेक्षा अधिकचे कर्ज असलेले ८ लाख अशा ४४ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. सरकारने ३० जून २०१६ पर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. याआधी सरकारने एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. चालू वर्षीचेही कर्ज माफ करण्याची मागणी मान्य करता येणार नाही. तसे कधीही झालेले नव्हते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. वरचे कर्ज फेडले तरच दीड लाखाची कर्जमाफी

दीड लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी आधी वरच्या कर्जाची परतफेड केली तरच त्यांना दीड लाखपर्यंत कर्जमाफी मिळेल. त्यामुळे या आठ लाख शेतकऱ्यांना आधी दीड लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या कर्जाची रक्कम बँकेत परतफेडीच्या स्वरूपात भरावी लागणार आहे. या निर्णयामुळे शेतकरी थकबाकीदार राहणार नाही, त्यांचा सातबारा कोरा होईल आणि त्यांना नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

आजच्या निर्णयाचे सर्व राजकीय पक्ष, संघटना आणि शेतकरी नेते स्वागत करतील, असा माझा विश्वास आहे. आता या विषयावर कोणीही राजकारण न करता कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन आहे. या कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर पडलेला बोजा सहन करण्याची आमची तयारी आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठीच्या तरतुदीत कुठेही कपात केली जाणार नाही. - मुख्यमंत्री सातवा वेतन आयोग योग्य वेळी कर्जमाफीच्या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लांबणीवर पडणार नाही. हा आयोग लागू करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे आणि योग्य वेळी त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.शनिवारी सरकारी सुटी असूनही मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि हा निर्णय झाला. आघाडी सरकारने २००९ मध्ये ७ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, दिवाकर रावते, पंकजा मुंडेंसह अनेक मंत्रीही पत्रकार परिषेदेला उपस्थित होते. परतफेडीस प्रोत्साहन : कर्जाची परतफेड नियमितपणे करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाच्या २५ टक्के वा २५ हजार रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्यात येईल. ३० जूनपर्यंत परतफेड करणाऱ्यांकडून २५ हजारांची वसुली होणार नाही.कर्जमाफी कोणाला नाही व कोणाला असेल?आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा परिषद व महापालिका सदस्य केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नाही. मात्र चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेल्या शेतकऱ्यांना लाभ.दहा लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापारी शेतकऱ्यांना लाभ नाही.शेतीशिवाय उत्पन्न असलेले आणि जे प्राप्तिकर भरतात त्यांना कर्जमाफी नाही.