शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

युपीएच्या धर्तीवर देशातल्या तमाम शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी द्यावी

By admin | Updated: March 20, 2017 21:30 IST

मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात नुक त्याच झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांची उभी पीके व फलोत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे

सुरेश भटेवरानवी दिल्ली, दि. 20  : मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात नुक त्याच झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांची उभी पीके व फलोत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीने केलेल्या या नुकसानीची भरपाई पीक विम्यातून होत नाही, यासाठी केंद्र सरकारने विशेष लक्ष घालून मराठवाड्यातल्या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्यसभेत शून्यप्रहरात काँग्रेस खासदार रजनी पाटील यांनी केली.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा अधोरेखित करतांना खासदार पाटील म्हणाल्या, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी देशात सर्वाधिक आहे. विशेषत: मराठवाड्यात शेतकऱ्यांना सलग तीन वर्षे दुष्काळाने हैराण केले. गतवर्षी केवळ पिण्याच्या पाण्यासाठी लातूरला वॉटर ट्रेन पाठवावी लागली. यंदा पाऊस बरा झाल्याने खरीप व रब्बीचे पीक चांगले आले. त्यानंतर शेती व्यवसायाला नोटबंदीचा फटका बसला.सहकारी बँकांकडून रक्कम मिळत नसल्याने या काळात शेतकऱ्यांना मातीमोल भावात आपला शेतमाल विकावा लागला. अनेक शेतकऱ्यांना तर खाजगी सावकारांकडून अधिक व्याजदराचे कर्ज उचलावे लागले. आता तीन दिवसांपूर्वी बिगरमोसमी पावसाच्या गारपीटीने अचानक शेतकऱ्यांना हैराण केले. निसर्ग आणि सरकारी निर्णय यांच्याशी सतत झुंज देत महाराष्ट्रातला शेतकरी हैराण झाला असून राज्यातल्या प्रमुख पक्षांनी मागणी केल्यानुसार युपीए सरकारच्या धर्तीवर त्यांचे कर्ज माफ करावे, इतकेच नव्हे तर देशातल्या तमाम शेतकऱ्यांचे कर्ज केंद्राने किमान एकदा माफ करावे, अशी मागणी खासदार पाटील यांनी शून्यप्रहरात केली.