शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

मरणोत्तर अवयवदानाचे प्रमाण मर्यादित

By admin | Updated: November 27, 2015 02:53 IST

‘मरावे परि अवयवरूपी उरावे’ याविषयी गेल्या काही वर्षांपासून जनजागृतीचे कार्यक्रम राज्यपातळीवर हाती घेण्यात आले आहेत. मात्र मरणोत्तर अवयवदानाचे प्रमाण मर्यादित राहिले असून

पूजा दामले,मुंबई‘मरावे परि अवयवरूपी उरावे’ याविषयी गेल्या काही वर्षांपासून जनजागृतीचे कार्यक्रम राज्यपातळीवर हाती घेण्यात आले आहेत. मात्र मरणोत्तर अवयवदानाचे प्रमाण मर्यादित राहिले असून, रुग्ण व गरजू व्यक्तींना त्यांच्या नातेवाइकांकडूनच अवयवदान करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे उपलब्ध आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. गेल्या २० वर्षांत राज्यात ८ हजार ४३९ जिवंत दात्यांनी अवयव दान केले आहे. मृत व्यक्तींच्या मिळालेल्या अवयवांचा आकडा ७५४ इतका आहे.१ जानेवारी १९९५ ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत जिवंत अवयवदात्यांकडून ८ हजार २२२ मूत्रपिंड, २१७ यकृत गरजू रुग्णांना मिळाले आहेत. तर, मृत व्यक्तींकडून झालेल्या अवयवदानातून ५६० मूत्रपिंड, १५८ यकृत, २ फुप्फुसे आणि इतर ३४ अवयव गरजूंना मिळाले आहेत. २०१२पासून म्हणजेच गेल्या ४ वर्षांत मृत व्यक्तींच्या अवयवदानाचा टक्का वाढलेला आहे. २०१४मध्ये ८० मूत्रपिंड, ४३ यकृत आणि अन्य १५ अवयवांचे दान झालेले आहे. मृत व्यक्ती अवयवदान करून इतर गरजू रुग्णांना जीवनदान देऊ शकते, याविषयी अजूनही जास्त प्रमाणात जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही जवळचे नातेवाईक अवयवदान करण्यास पटकन तयार होत नाहीत. या मानसिकतेत बदल होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सह संचालक डॉ. गौरी राठोड यांनी सांगितले. अवयवदान जनजागृती अवयवदान दिनानिमित्त महापालिकेद्वारे जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पहिला कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता आझाद मैदान पोलीस ठाणे येथे होईल. कार्यक्रमात अवयवदान प्रक्रियेमध्ये पोलिसांची भूमिका या विषयावर के.ई.एम. रुग्णालयाच्या डॉ. कामाक्षी भाटे व डॉ. सुजाता पटवर्धन मार्गदर्शन करतील. दुसरा कार्यक्रम दुपारी १.०० वाजता परळमधील केईएममध्ये होईल. ‘ब्रेन डेड’ झालेल्या व्यक्तीचा हात, दुसऱ्या व्यक्तीच्या तुटलेल्या हातावर प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट) करण्याची अत्यंत कठीण अशी सूक्ष्म शस्त्रक्रिया (मायक्रो सर्जरी) करणारे केरळमधील कोची येथील डॉ. सुब्रमण्यम अय्यर हे या वेळी मार्गदर्शन करतील.ज्या व्यक्तींना अवयव दानासाठी ‘दाता’ म्हणून नोंदणी करायची असेल, त्यांच्यासाठी महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये दाता नोंदणी करता येईल.